विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, वस्तीगृहातील जेवनात पाल
By Admin | Updated: February 12, 2017 22:45 IST2017-02-12T22:45:04+5:302017-02-12T22:45:04+5:30
आपल्या देशात वसतीगृह आणि तिथलं जेवण याची काय अवस्था आहे, याचं आणखी एक भीषण वास्तव समोर आलं

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, वस्तीगृहातील जेवनात पाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - आपल्या देशात वसतीगृह आणि तिथलं जेवण याची काय अवस्था आहे, याचं आणखी एक भीषण वास्तव समोर आलं आहे. मुंबईतल्या चेंबूर भागात सामाजिक न्याय विभागाचं मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे. तिथल्या मेसमध्ये आज चक्क पाल सापडली. अशोक पिंपळकर असं या निष्काळजी कंत्राटदाराचं नाव आहे.
जेवनात पाल आढळळ्यानंतर छात्र भारती संघटनेचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी वस्तीगृहातील विद्यार्थाशी संवाद साधत वस्तीगृहातील समस्याबाबत आवाज उठवत याबाबतची तक्रार दाखल करण्यात यावी यासाठी थेट पोलीस स्थानकात आवेदन दिले आहे. यामध्ये विद्यार्थ्याच्या विविध समस्या आणि त्यापासून विद्यार्थ्यांना होणारा त्रासाची माहिती दिली आहे.