मुंबई - प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर कोणतेही बंधन नाही. एकदाच वापरात येणारी प्लास्टिकची वस्तू म्हणून त्यांच्यावर प्रतिबंध नाही, असे केंद्र सरकारनेउच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ११ सप्टेंबर २०२३ रोजी पर्यावरण, वन आणि हवामन बदल मंत्रालयाला एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकची वस्तू म्हणून बंदी घालण्याची मागणी केली होती. ग्रोअर्स फ्लॉवर्स कौन्सिल ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेत बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये प्लास्टिकच्या फुलांचाही समावेश करण्याची मागणी केली. केंद्र सरकारने मुख्य न्या. आलोक आराधे व न्या.मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाला सांगितले की, सीपीसीबीच्या शिफारशीमध्ये तथ्य नाही.प्लास्टिक फुलांना एकदा वापरात येणाऱ्या वस्तूंमध्ये समावेश करू शकत नाही, असे केंद्र सरकारने म्हटले.
फुलांच्या वापरावर बंदीसीपीसीबी, एमपीसीबी, एनजीटीच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. राज्य सरकारला प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर बंदी घालणारी अधिसूचना जारी करण्याचा अधिकार आहे, असे याचिकाकर्त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
सुनावणी तीन आठवड्यांनीयाचिकेत अधिसूचना जारी करण्याची मागणी नाही. प्लास्टिकच्या फुलांवर बंदी फक्त तेव्हाच लागू केली जाऊ शकते जिथे कायदेशीर बंदी असेल, असे न्यायालयाने म्हटले. याचिकाकर्त्यांनी याचिकेत सुधारणा करण्याची मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली.