प्लॅस्टिक बंदीचा उडाला फज्जा
By Admin | Updated: December 28, 2014 23:20 IST2014-12-28T23:20:59+5:302014-12-28T23:20:59+5:30
शहर आणि सिडको वसाहतीत गंभीर होत चाललेली कचरा समस्या सोडविण्यासाठी ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा पालिका व सिडको प्रशासनाचा निर्णय फुसका बार ठरला

प्लॅस्टिक बंदीचा उडाला फज्जा
पनवेल : शहर आणि सिडको वसाहतीत गंभीर होत चाललेली कचरा समस्या सोडविण्यासाठी ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवीवर बंदी घालण्याचा पालिका व सिडको प्रशासनाचा निर्णय फुसका बार ठरला आहे. शहरात प्लॅस्टिक बंदी लागू करून काही वर्षे उलटली तरी अद्यापही अनेक व्यावसायिकांकडून ग्राहकांना राजरोसपणे बंदी असलेल्या पिशव्या दिल्या जात आहेत, तसेच त्यापुढील आकाराच्या पिशव्याही कोणताही दर न आकारता मोफत दिल्या जात आहेत.
वाढत्या लोकसंख्येनुसार पनवेल शहरात दररोज किमान ४० टन कचऱ्याची निर्मिती होते, तर सिडको वसाहतीत सुमारे दीडशे टन कचरा बाहेर पडत असल्याची नोंद आहे. या दोन्ही ठिकाणच्या कचऱ्यात ७५ टन कचरा हा प्लॅस्टिक अथवा कॅरिबॅगचा असल्याचे आढळून येत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा असल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. त्यामुळे कायद्यानेच बंदी असलेल्या ५० मायक्रॉनहून कमी जाडीच्या पिशवीवर सिडकोच्या मुख्य आरोग्य अधिकारी आणि पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आदेश देऊन शहरात व वसाहतीत बंदी घातलेली आहे. तसेच, आरोग्य निरीक्षकांनीही कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)