नियोजन : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:15+5:302021-05-07T04:07:15+5:30

पास-नापास नाही तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजे त्यांच्या ...

Planning: Classed remarks on the marks of first to fourth year students! | नियोजन : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा !

नियोजन : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वर्गोन्नत शेरा !

googlenewsNext

पास-नापास नाही तर झालेल्या परीक्षांच्या आधारावर श्रेणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पहिली ते चौथीचे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी, उपक्रमामधील सहभाग, परिवार अभ्यासाविषयी, सामान्य ज्ञानाविषयी असलेली माहिती आणि गणिताची सांडगी आकडेमोड, भाषेतील अक्षरांची शब्दांची ओळख व वाक्यरचना हे सारे असते. याचसोबत अंतिम निकालावर असते ती त्याचे वजन, उंची, खेळांतील सहभाग यांच्याविषयीची माहिती असते.

एकूणच आकारिक आणि संकलित मूल्यमापन या दोन्हींचा समावेश अंतिम निकालात असतो आणि त्या आधारावर त्यांचे गुणांकन केले जाते. मात्र यंदा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या संकलित मूल्यमापनावर विद्यार्थ्यांना वर्गोन्नतचा शेरा निकालावर मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणच घेतले नाही किंवा उपस्थिती नाही त्यांचे मूल्यांकन करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांबाबत नेमकी कार्यवाही कशी करावी? निकाल कसा द्यावा यासंबंधी मार्गदर्शक सूचना शाळांना दिल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नसल्याने शाळांना आणि तेथील शिक्षकांना विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापनही करता आलेले नाही. त्यामुळे आरटीई कलम १६ च्या नियमानुसार प्रतिपुस्तकावर आरटीई ॲक्ट १६ नुसार वर्गोन्नत असा शेरा देण्यात येणार आहे.

ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची फक्त संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची संपादणूक लक्षात घेता त्याचे रूपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करण्यात यावी, अशा सूचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या ज्या काही छोट्या परीक्षा, चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंदा त्यांना गुणदान करून त्यांचे श्रेणीत रूपांतर करून त्यांना सदर शेरा देण्यात येईल, अशी माहिती कुर्ला येथील शिशुविकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अशोक वेताळ यांनी दिली. संकरित आणि आकारिक मूल्यमापन यांना ५०-५० गुणांची विभागणी करून हे मूल्यमापन करणे अपेक्षित होते. मात्र अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाईन अनुपस्थिती, उपक्रमात असलेला प्रत्यक्ष सहभाग यांमुळे या सगळ्यांना मर्यादा आल्याचे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम

एससीईआरटीकडून नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन होऊ शकले नाही, त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई शेरा नमूद करण्यात येणार आहे. मात्र अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे असे म्हटले आहे. तसेच एससीईआरटीकडून तयार करण्यात आलेल्या विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी. सोबत नियमित वर्ग शिकवणीची प्रक्रियाही पूर्ण करावॆ असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एससीईआरटीकडून शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार त्याच्या सूचना स्वतंत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------

मुंबईतील पहिली ते चौथी विद्यार्थिसंख्या

पालिका - डिव्हायडी (उपसंचालक कार्यालय अखत्यारीतील)

पहिली - १३१८९५- २४३४०

दुसरी - १३३३८१- २५२२२

तिसरी - १४०५७८- २५४९२

चौथी - १४६५२५- २४९३३

------

चौकट

मुले घरात कंटाळली (विद्यार्थी प्रतिक्रिया)

वर्षभरापासून घरात असल्याने आता सुट्टीचाही कंटाळा आला आहे. शाळा सुरू असती तर मित्रांना भेटलो असतो, खेळलो असतो आणि अभ्यासही झाला असता.

- श्रवण राणे, चौथी, नरवडे प्राथमिक विद्यामंदिर

------

आता ऑनलाईन अभ्यासाचा कंटाळा आहे. प्रगतिपुस्तक हातात आले नाही. मात्र आम्ही पास आहोत हे माहिती आहे. मात्र शाळा आता लवकरात लवकर सुरू व्हायला हवी. शिक्षकांसोबत शाळेत अभ्यास जास्त चांगला होतो.

- किमया आचरेकर, चौथी, दहिसर विद्यामंदिर

Web Title: Planning: Classed remarks on the marks of first to fourth year students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.