नियोजन प्राधिकरणाचा म्हाडाला लवकरच दर्जा, मुख्यमंत्री अनुकूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:48 IST2018-02-01T04:48:29+5:302018-02-01T04:48:40+5:30
मुंबईत एमएमआरडीए, महापालिका आणि सिडकोच्या धर्तीवर म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा (प्लॅनिंग अॅथॉरिटी) दर्जा देण्याचा प्रस्ताव, राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. मुख्यमंत्री या प्रस्तावाला अनुकूल असून, लवकरच तो मंजूर होण्याची शक्यताही मेहता यांनी व्यक्त केली आहे.

नियोजन प्राधिकरणाचा म्हाडाला लवकरच दर्जा, मुख्यमंत्री अनुकूल
मुंबई - मुंबईत एमएमआरडीए, महापालिका आणि सिडकोच्या धर्तीवर म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा (प्लॅनिंग अॅथॉरिटी) दर्जा देण्याचा प्रस्ताव, राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. मुख्यमंत्री या प्रस्तावाला अनुकूल असून, लवकरच तो मंजूर होण्याची शक्यताही मेहता यांनी व्यक्त केली आहे. म्हाडा पत्रकार संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त, बुधवारी म्हाडा भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मेहता यांनी ही माहिती दिली.
मेहता म्हणाले की, विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत म्हाडाचे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येतात, पण पालिकेच्या मंजुरीशिवाय प्रकल्प उभे राहत नाहीत. त्यामुळे अनेक प्रकल्प रखडतात. त्यामुळे म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव तयार झाला. सिडको, एमएमआरडीला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. त्याच धर्तीवर म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. म्हाडाच्या प्रकल्पांना गती मिळण्यासाठी म्हाडा प्राधिकरणास नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री अनुकूल असल्याचेही त्यांनी सांगितले.