बँडस्टँडवर विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:18 AM2020-12-04T04:18:02+5:302020-12-04T04:18:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेतर्फे वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्यात येत असून, नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ आणि मुंबईला भेट ...

Plane on the bandstand | बँडस्टँडवर विमान

बँडस्टँडवर विमान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेतर्फे वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करण्यात येत असून, नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ आणि मुंबईला भेट मिळालेले सी-हॅरीअर विमान वांद्रे येथील बँडस्टँडवर बसविण्यात आले. नौदलाकडून हे विमान औपचारीकरीत्या गुरुवारी प्रदान करण्यात आले.

निवृत्त आयएनएस विराट युद्धनौकेवर हे विमान तैनात होते. आता सामान्य नागरिकांनाही ते पाहता येईल. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनाला दरवर्षी या परिसरात विद्यार्थ्यांचे संचलन होत असते. त्यामुळे या परिसरात भारतीय सामर्थ्य दाखविणारे हे विमान ठेवण्यात आले आहे. मुंबईसाठी ही अनोखी भेट असून यामुळे पर्यटन सौंदर्यात आणखी भर पडेल, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

Web Title: Plane on the bandstand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.