पीयूष गोयल यांचा सराफांना दिलासा

By Admin | Updated: April 13, 2016 02:41 IST2016-04-13T02:41:05+5:302016-04-13T02:41:05+5:30

ज्वेलर्सवरील अबकारी कराप्रकरणी बाजारापेठांत इनस्पेक्टर राज चालू देणार नाही; शिवाय अधिकारी वर्गाला दिलेले अटकेचे अधिकारही संपुष्टात आणले जातील, असे आश्वासन केंद्रीय ऊर्जामंत्री

Piyush Goyal wins gold | पीयूष गोयल यांचा सराफांना दिलासा

पीयूष गोयल यांचा सराफांना दिलासा

मुंबई : ज्वेलर्सवरील अबकारी कराप्रकरणी बाजारापेठांत इनस्पेक्टर राज चालू देणार नाही; शिवाय अधिकारी वर्गाला दिलेले अटकेचे अधिकारही संपुष्टात आणले जातील, असे आश्वासन केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी ज्वेलर्सच्या शिष्टमंडळाला दिले.
मुंबई ज्वेलर्स संघटनेने सह्याद्री अतिथीगृहावर पीयूष गोयल यांची भेट घेतली. या वेळी भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा, आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कंबोज आदी उपस्थित होते. पीयूष गोयल म्हणाले, ‘व्यापारी आणि उत्पादकांनी अबकारी कराला घाबरण्याची गरज नाही. कारण सरकार व्यापारी वर्गाच्या भावनांचा आदर करते.’ (प्रतिनिधी)

Web Title: Piyush Goyal wins gold