सातपाटीमध्ये पाइपलाइन फुटली

By Admin | Updated: October 7, 2014 00:40 IST2014-10-07T00:40:03+5:302014-10-07T00:40:03+5:30

सातपाटी येथील नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन अनेक वेळा नादुरूस्त होऊन फुटत आहे.

Pipeline fissures in Satpati | सातपाटीमध्ये पाइपलाइन फुटली

सातपाटीमध्ये पाइपलाइन फुटली

सातपाटी : सातपाटी येथील नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन अनेक वेळा नादुरूस्त होऊन फुटत आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असून यावर उपाययोजना आखण्यात सातपाटी ग्रामपंचायत अपयशी ठरत असल्याने नागरिकांमधून तीव्र पडसाद उमटत आहेत.
मासवण येथील सूर्या नदीवर बांधण्यात आलेल्या २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेची जलकुंभामधून पालघरसह अस्वाली, धनसार, शिरगाव, सातपाटी, उमरोली इ. सह २६ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेतील सातपाटी हे शेवटचे गाव असून या गावातील नळपाणी पुरवठा करण्यात आलेले पाईप हे जुनाट झाल्याने कधीही फुटतात. त्यामुळे सातपाटी गावाला आजही २ ते ३ दिवसआड पाणीपुरवठा करावा लागतो. पाणी वितरणाचा दाब वाढविल्यास ही पाईपलाईन फुटत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने नव्याने बसविलेले पाईप फक्त धनसारपर्यंतच आल्याने शिरगाव ते सातपाटी दरम्यानची जुनी पाईपलाईन नेहमी फुटून नेहमी हजारो लिटर्स पाणी वाया जात असते. कालपासून सातपाटीच्या श्रीराममंदिरापर्यंत पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून पालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी निवडणूकीत व्यग्र असल्याने दुरूस्तीस विलंब होत आहे. त्यामुळे दीर्घ पाणी टंचाईला सामोरे जाण्याची आपत्ती ओढवू शकते. (वार्ताहर)

Web Title: Pipeline fissures in Satpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.