वर्सोवा, यारी रोड येथील गुलाबी मतदान केंद्र महिलांना समर्पित

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 20, 2024 12:05 IST2024-05-20T12:05:29+5:302024-05-20T12:05:55+5:30

निवडणूक प्रक्रियेत महिलांचा अधिक रचनात्मक सहभाग असावा यासाठी वचनबद्ध केलेला उपक्रम आहे. 

Pink polling station at Versova, Yari Road dedicated to women | वर्सोवा, यारी रोड येथील गुलाबी मतदान केंद्र महिलांना समर्पित

वर्सोवा, यारी रोड येथील गुलाबी मतदान केंद्र महिलांना समर्पित

मुंबई-27, मुंबई उत्तर पश्चिम संसदीय मतदारसंघ 164 वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वर्सोवा,यारी रोड येथील गुलाबी  मतदान केंद्र महिलांना समर्पित केले आहे.महिलांना समर्पित विशेष मतदान केंद्र 164 वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील  यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक - 208  हे "सर्व-महिला व्यवस्थापित मतदान केंद्र" आहे. हा लिंग समानता आणि निवडणूक प्रक्रियेत महिलांचा अधिक रचनात्मक सहभाग असावा यासाठी वचनबद्ध केलेला उपक्रम आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या  निर्देशा नुसार दिले प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक 'सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्र' असावे जेथे पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह संपूर्ण मतदान कर्मचारी महिला असतील.त्यानुसार सदर मतदान केंद्र महिलांनी समर्पित केले आहे अशी माहिती येथील सहायक निवडणूक अधिकारी सुभाष काकडे यांनी दिली.

Web Title: Pink polling station at Versova, Yari Road dedicated to women

टॅग्स :Mumbaiमुंबई