लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांमध्ये महापालिका विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहे. त्यासाठी पालिकेची ‘पिंक आर्मी’ मैदानात उतरणार असून, १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ यांसह बाजारपेठ परिसरांमध्ये संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे.
परिमंडळांचे उपायुक्त तसेच सर्व प्रशासकीय विभाग स्तरावरील सहायक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अधिक दक्षतेने स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच, कर्मचारी-अधिकाऱ्यांसोबतच नागरिकांनाही या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
दिवाळीपूर्व स्वच्छता मोहिमेत दिवसाच्या दुसऱ्या सत्रात स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ‘पिंक आर्मी’च्या सहाय्याने ही मोहीम सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत राबविण्यात येईल. या अंतर्गत रस्ते तसेच गल्लीबोळांतील कचरा, माती, राडारोडा आदी संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
कचऱ्याचे संकलननाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ४,९७४ मनुष्यबळ, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ४७९ साधनसामग्री तसेच वाहनांद्वारे सर्व प्रशासकीय विभागात विविध ठिकाणी राबविलेल्या या मोहिमेत एकूण १२४.५५ टन कचऱ्याचे संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
वाढीव मनुष्यबळाचा वापरयेत्या शनिवारपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि नीटनेटकी राहावीत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालिकेच्या वतीने ‘पिंक आर्मी’चा सहभाग, वाढीव मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, असे अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी संगितले.
Web Summary : Mumbai's 'Pink Army' will conduct a special cleanliness drive from October 15-19 before Diwali. The drive will focus on cleaning roads, dividers, footpaths, and market areas. The initiative encourages citizen participation and aims to manage waste effectively using increased manpower and machinery.
Web Summary : दिवाली से पहले मुंबई में 15-19 अक्टूबर तक 'पिंक आर्मी' विशेष सफाई अभियान चलाएगी। सड़कों, डिवाइडरों, फुटपाथों और बाजार क्षेत्रों की सफाई पर ध्यान केंद्रित किया जाएगा। इस पहल में नागरिकों की भागीदारी को प्रोत्साहित किया गया है।