चिमुकले हात जखडले कामात...

By Admin | Updated: June 12, 2014 02:39 IST2014-06-12T02:39:35+5:302014-06-12T02:39:35+5:30

लहान मुलांना काय कळते, आम्हीच त्यांचे निर्णय घेतो, असे त्यांचे पालक, कुटुंबीय नेहमीच म्हणतात. मात्र लहान मुलांना हक्क असतात.

The pimples were tied ... | चिमुकले हात जखडले कामात...

चिमुकले हात जखडले कामात...

मुंबई : लहान मुलांना काय कळते, आम्हीच त्यांचे निर्णय घेतो, असे त्यांचे पालक, कुटुंबीय नेहमीच म्हणतात. मात्र लहान मुलांना हक्क असतात. लहान मुलांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे. मात्र तरीही छुप्या मार्गाचा अवलंब करून बालकामगार मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी काम करीत आहेत. प्रथम संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ४ हजार ६५४ बालकामगार मुंबईत आढळून आले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून झालेल्या जनजागृतीमुळे दर्शनी भागामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र तरीही प्रत्यक्षात बालकामगार कमी झालेले नाहीत. कामगार विभाग, समाजसेवा शाखा पोलीस आणि प्रथम संस्थेने मिळून अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या अ‍ॅक्शन प्लॅन अंतर्गत जानेवारी ते मे २०१४ पर्यंत मुंबईतील आग्रीपाडा, धारावी, भायखळा, नागपाडा अशा विविध ठिकाणी एकूण १९ धाडी टाकलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी एकूण ४०५ बालकांची सुटका केली.
जानेवारी २०१४ मध्ये प्रथम संस्थेने एकत्र केलेल्या माहितीनुसार, ४ हजार ६५४ बालकामगार त्यांना मुंबईमध्ये आढळून आले होते. मुंबईमध्ये काही भाग असे आहेत, जिथे लघुउद्योग चालू असतात. अनेकदा हे उद्योग अनधिकृत असतात. बऱ्याचदा मुलांना एका बंद खोलीत काम करण्यास बसवले जाते. यामुळे इथे लहान मुले काम करत असल्याचे लक्षात येत नाही.

Web Title: The pimples were tied ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.