तिवरे झाली मृतप्राय

By Admin | Updated: September 25, 2014 00:37 IST2014-09-25T00:37:09+5:302014-09-25T00:37:09+5:30

रानगांव समुद्रकिनाचा लगतची असंख्य तिवरांची झाडे अचानक मृतप्राय होऊ लागल्याने हा नैसर्गिक बदल आहे की सदर झाडे तोडण्यासाठी काही वेगळा प्रयत्न केला जात आहे

The piglets are dead | तिवरे झाली मृतप्राय

तिवरे झाली मृतप्राय

नायगांव : रानगांव समुद्रकिनाचा लगतची असंख्य तिवरांची झाडे अचानक मृतप्राय होऊ लागल्याने हा नैसर्गिक बदल आहे की सदर झाडे तोडण्यासाठी काही वेगळा प्रयत्न केला जात आहे. याबाबत अजूनही तपास लागलेला नाही.
वसईतील रानगांव हा नयनरम्य समुद्र किनारा आहे. नजीकच खाडीभाग आहे. हजारो एकरच्या या खारजमिनीवर मोठ्या प्रमाणात तिवरांची समजल्या जाणाऱ्या सदर जमिनीवरील ही झाडे अचानक वाळून मरू लागल्याने शंका निर्माण झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
यापूर्वी असा प्रकार दिसला नाही. हा संपूर्ण भाग मुख्य रस्त्यालगतचा खाडी भाग आहे. यापूर्वी भुईगांव येथे गोड्या पाण्याचा वापर करून भूमाफियांनी अनेक तिवरांची वने नष्ट केली. अशाच प्रकराची पुनरावृत्ती तर या भागात होत तर नाही ना? असा सवाल स्थानिक नागरिकंनी केला आहे. रिसॉर्टस्, अनधिकृत बांधकामे या साठी सध्या भूमाफियांना जमीनच शिल्लक राहिलेली नाही.
त्यामुळे हळूहळूही संस्कृती रूजण्यासाठी अशाच स्वरूपाची पध्दत वापरून ही जमीन कब्जा तर होणार नाही. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The piglets are dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.