Join us  

Video : पिक्चर अभी बाकी है... शिवसेनेकडून 100 दिवसांच्या कामांचा ट्रेलर लाँच 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 10:41 AM

महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले असून शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सहकुटुंब अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी ते मुंबईतून रवाना झाले आहेत. अयोध्येत शिवसेनेचे खासदार, मंत्री यासह अनेक शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केलंय. त्यातच, शिवसेनेकडून 100 दिवसांतील कामाचा लेखाजोखा मांडणारा व्हिडीओही रिलीज करण्यात आला आहे.   

महाविकास आघाडी सरकारचे 100 दिवस पूर्ण झाले असून शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर, शिवसेनेने 111 सेंकदात 100 दिवसांच्या कामांचा लेखाजोखा मांडला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, सर्वसामान्यांना शिवभोजन थाळी, यांसह राज्यात सुरू असलेल्या विकास कामांची झलक या व्हिडीओच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. तसेच, पिक्चर अभी बाकी है... असेही या व्हिडीओत म्हटले आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेनं या व्हिडीओत आपल्या सहकारी पक्षांचेही कौतुक केलंय. यांच्या मदतीमुळेच हे शक्य झाल्याचं या व्हिडीओत म्हटल आहे. शिवसेनेकडून महाविकास आघाडी सरकारची ही चित्रफित नेमकं उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादिवशी प्रदर्शित करण्यात आली आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी राज्य अतिथीचा दर्जा दिला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लखनौला जाऊन आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी या दौऱ्यासाठी संपूर्ण सहकार्य करू असे आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेसरकारअर्थसंकल्प