नेरळ येथून पिक-अप टेम्पोच्या चोरीचे सत्र

By Admin | Updated: May 24, 2014 00:56 IST2014-05-24T00:56:16+5:302014-05-24T00:56:16+5:30

नेरळ येथून गाड्या चोरीला जाण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही

The pickup tempo stolen season from Neral | नेरळ येथून पिक-अप टेम्पोच्या चोरीचे सत्र

नेरळ येथून पिक-अप टेम्पोच्या चोरीचे सत्र

नेरळ : नेरळ येथून गाड्या चोरीला जाण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा पिक-अप गाडीची चोरी झाल्याची नोंद नेरळ पोलीस ठाण्यात रामदास शिवराम शिंगटे यांनी केली आहे. वर्षभरात तीन पिक-अप, तर अनेक दुचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना नेरळमध्ये घडल्या आहेत. पोलीस ठाण्याकडून केवळ नोंद ठेवण्याशिवाय कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसल्याने नेरळ टेम्पो संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे . नेरळ टेपआळी भागात राहणारे टेम्पो व्यवसायिक रामदास शिंगटे यांनी आपली पिक-अप गाडी मंगळवारी घराजवळ पार्क करून ठेवली होती, मात्र बुधवार ती पिक-अप गाडी तेथे दिसून आली नाही म्हणून शिंगटे यांनी गाडीची शोधाशोध सुरु केली, मात्र पूर्ण दिवस शोध घेवूनही गाडी मिळाली नाही. सदर गाडी शिंगटे यांनी मागील तीन महिन्यापूर्वी नवीन कोरी विकत घेतली होती. सहा लाख किमतीच्या या पिक -अप गाडीची चोरी झाल्याची तक्र ार रामदास शिवराम शिंगटे यांनी नेरळ पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी गाडीचा शोध सुरु असल्याची माहिती दिली. मात्र मागील वर्षभरात तब्बल तीन पिक-अप गाड्यांची चोरी झाली आहे . त्यापैकी एकही गाडीचा शोध नेरळ पोलिसांना लागला नाही, तर दुसरीकडे नेरळ बाजारपेठेतून अनेक दुचाकी चोरीला गेल्या. त्यांचाही शोध यथातथाच आहे. (वार्ताहर)

Web Title: The pickup tempo stolen season from Neral