लोणच्याच्या बरण्यांचा बाजार मंद

By Admin | Updated: May 19, 2015 23:13 IST2015-05-19T23:13:11+5:302015-05-19T23:13:11+5:30

लोणच्याच्या आधी घरात येते ती त्याच्या साठवणीसाठी लागणारी चिनी मातीची किंवा काचेची बरणी. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून त्यांचा बाजार तेजीत येऊ लागतो.

The pickle market is slow | लोणच्याच्या बरण्यांचा बाजार मंद

लोणच्याच्या बरण्यांचा बाजार मंद

ठाणे : लोणच्याच्या आधी घरात येते ती त्याच्या साठवणीसाठी लागणारी चिनी मातीची किंवा काचेची बरणी. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून त्यांचा बाजार तेजीत येऊ लागतो. परंतु यंदा कैऱ्यांचीच आवक फारशी नसल्याने व तिच्यात वाढ होण्याची शक्यता नसल्याने या दोनही बरण्यांची बाजारपेठ थंडच आहे.
लोणच्यासाठी लागणाऱ्या चिनी माचीच्या बरण्या उत्तरप्रदेशातील खुर्जा येथे तयार होतात. येथे त्याचे अडीचशे कारखाने आहेत. आधी या बरण्या साध्या स्वरुपात तयार होतात. व नंतर त्यावर चिनी मातीचा लेप चढवला जातो. तो साधारणत: पिवळा अथवा पांढऱ्या रंगाचा असतो. हा लेप चढवल्यामुळे ही बरणी एअरप्रुफ होते. म्हणजे आतली हवा बाहेर जात नाही व बाहेरची हवा आत येत नाही. त्यामुळे लोणचे जास्त दिवस टिकते. यातल्या काही बरण्यांना फिरकीचे झाकण असते. ते फिरवून बंद करता येते. ही बरणी अधिक सुरक्षित मानली जाते. तर ज्या बरण्यांना नुसते वरून ठेवण्याचे झाकण असते, तिच्या तोंडावर आधी स्वच्छ सुती कपडा ठेवून मग त्यावर झाकण ठेवावे लागते. तेव्हा ती बरणी एअर टाईट होते.
या बरण्यांचे तीन प्रकार असतात. एक थरी, दोन थरी आणि तीन थरी म्हणजे बरणीवर चिनी मातीचे जेवढे थर दिलेले असतात. त्यानुसार तिचा दर्जा आणि किंमत ठरते. थर जेवढे जास्त तेवढी ती महाग समजली जाते. कारण या जास्त थरांमुळे ती चकचकीत दिसते. शिवाय तिची एअरप्रुफ क्षमता वाढलेली असते. यामुळेच दुकानातील काही बरण्या अत्यंत चकचकीत आणि डार्क पिवळ्या, पांढऱ्या रंगाच्या तर काही फिक्कट पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या वाटतात. त्यांची क्षमता लिटर मध्ये मोजली जाते. पाच लिटर पासून ते २५ लिटर पर्यंतच्या तर काही ठिकाणी ३५ लिटर पर्यंतच्या चिनी मातीच्या बरण्या मिळतात. पाच लिटर क्षमतेच्या बरण्या साधारणत: दोन ते तीन किलो लोणचे मावते.
(विशेष प्रतिनिधी)

काचेच्या बरण्यांच्या निवडी मागील तंत्र
४काचेच्या बरण्या मात्र ५ ते ७ किलो क्षमते पर्यंतच मिळतात. चिनी मातीच्या तुलनेत काच ठिसूळ असल्याने हा फरक पडतो. लोणच्यासाठी काचेची बरणी घेताना काच ही नितळ व तिचे झाकण फूड ग्रेडचे जाड असेल असे पाहून घ्यावी स्वस्तात मिळणाऱ्या काळ्या रंगाचे हलके झाकण असणाऱ्या बरण्या या रिसायकल्ड मालापासून बनविलेल्या असल्याने त्या स्वस्त असतात. परंतु त्यातील लोणचे टिकाऊ राहत नाही.

अनेक आकार
४चिनी मातीच्या बरण्या हंडी, चौकोनी , उभट अशा अनेक आकारात मिळतात. हंडी मध्येही साधी हंडी आणि निमुळती हंडी असे दोन आकार असतात. परंतु हंडी बरण्या जास्तीत जास्त दहा लिटर क्षमते पर्यंतच मिळतात. कारण त्या हाताळण्यास सोप्या जातात.

पसंती चिनी
मातीच्याच बरण्यांना
४लोणचे घालण्यासाठी तेल लावलेला माठ, काचेच्या बरण्या, चिनीमातीच्या बरण्या असे पर्याय उपलब्ध असतात. परंतु काचेचा ठिसूळपणा, माठाचा असुरक्षितपणा लक्षात घेता सगळ्यांची पसंती चिनी मातीच्या बरण्यांना असते. ती टिकाऊ असल्यामुळे एकदा घेतली की अनेक वर्षे टिकते. साधारणत: दर्जानुसार १०० ते १६० रु. लिटर दराने या बरण्या उपलब्ध असतात.

Web Title: The pickle market is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.