‘सत्त्व’मध्ये घडणार स्पॅनिश संस्कृतीचे दर्शन
By Admin | Updated: January 9, 2017 07:10 IST2017-01-09T07:10:51+5:302017-01-09T07:10:51+5:30
पदवी महाविद्यालयांत डिसेंबर महिन्यात फेस्टिव्हल आणि डेज साजरे होतात. जानेवारी महिना सुरू झाल्यापासून, फेस्टिव्हलची लगबग, तयारी

‘सत्त्व’मध्ये घडणार स्पॅनिश संस्कृतीचे दर्शन
मुंबई : पदवी महाविद्यालयांत डिसेंबर महिन्यात फेस्टिव्हल आणि डेज साजरे होतात. जानेवारी महिना सुरू झाल्यापासून, फेस्टिव्हलची लगबग, तयारी अभियांत्रिकी महाविद्यालयांत दिसून येते. मुंबईतल्या विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सध्या फेस्टच्या तयारीत व्यस्त आहेत. विलेपार्ले येथील मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेट अँड इंजिनीयरिंग (एनएमआयएमएस) महाविद्यालयात ‘सत्त्व’ हा फेस्ट रंगणार आहे.
१० ते १२ जानेवारी या दरम्यान ‘एनएमआयएमएस’मध्ये सत्त्व फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आहे. या फेस्टची संकल्पना हटके ठेवण्यात आली आहे. ‘स्पॅनिश संस्कृती’ अशी संकल्पना असून, त्या आधारे काही स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. या फेस्टचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘मॅनेक्वीन चायलेंज’ हे आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुतळ््यासारखे तयार होऊन उभे राहायचे आहे. आकर्षक, पण कठीण असणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असल्याचे सत्त्वच्या टीमकडून सांगण्यात आले.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास, प्रोजेक्ट याचा सतत ताण असतो. या फेस्टच्या माध्यमातून दोन क्षण विरंगुळा आणि विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा, म्हणून खास स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्टँडअप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. सुमो झॉब्रिंग आणि मि. अँड मिस. सत्त्व या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या फेस्टमध्ये बॉलीवूड कलाकारदेखील सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)