Join us
Daily Top 2Weekly Top 5

दार्शनिक मुंबई प्रेस मीडिया आणि मिस अँड मिस्टर ॲवॉर्ड सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 02:25 IST

मुंबईतील ग्रँड पेनिंसुला हॉटेलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पत्रकारिता, राजकीय व सिनेसृष्टीत विशेष कामगिरी बजाविणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले.

 मुंबई : एस.के.एम.एच. फिल्म प्रोडक्शन आणि दार्शनिक मुंबईच्या वतीने शनिवारी दार्शनिक मुंबई प्रेस मीडिया आणि मिस अँड मिस्टर ॲवॉर्ड सोहळा संपन्न झाला. मुंबईतील ग्रँड पेनिंसुला हॉटेलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात पत्रकारिता, राजकीय व सिनेसृष्टीत विशेष कामगिरी बजाविणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, लोकमत ग्रुपचे विजय शुक्ला, आमदार दिलीप लांडे, कामगार नेते अभिजीत राणे, भोजपुरी ॲवार्डचे संस्थापक विनोद गुप्ता, ॲडव्होकेट शैलेश दुबे आणि सुधीर दुबे उपस्थित होते. या सोहळ्यात अभिनेते रजा मुराद, राजेश पुरी, अली खान, लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री हेमानी शिवपुरी, सूत्रसंचालक चारुल मलिक, संगीत दिग्दर्शक दिलीप सिंग, ग्लोबल सनशाइन ट्रेडिंग कंपनीचे सुरज सुभाष माते, आश्रम वेबसिरीजचे लेखक संजय मासूम, सिमरन वेब सिरीजची अभिनेत्री क्रिती वर्मा, उडान मालिकेतील अभिनेत्री मालवी मल्होत्रा, संगीत दिग्दर्शक राज आशू, स्टाइल डिवाच्या पारुल चौधरी यांना, नागिन फाईव्ह मालिकेचे दिग्दर्शक रंजन कुमार सिंग, एंटरटेन्मेंट पी. आर. अवंतिका सिंह, फॅशन मॉडेल अर्चना जैन, अभिनेते कुमार आदर्श, ट्रॉफी मॅन्युफॅक्चरर गणेश पाचारणे, अभिनेते दीपक भोजपुरी, एंटरटेन्मेंट रिपोर्टर अचल चौधरी, चाईल्ड वेल्फेअर कमिटीचे संदेश दशरथ शिरसाट, पत्रकार संदीप मोहन मलवडे, फॅशन फोटोग्राफर ब्लेसन सॅम्युअल, सामाजिक कार्यकर्त्या सलमा मेमन यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार फिल्म्स (डीपीआयएएफ) संस्था, केजे वॉटर, डीपीआयएएफ-रोटी आणि कपडा बँक, ग्लोबल सनशाईन, के.जे. टॉकीज ओटीटी प्लॅटफॉर्म यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.

टॅग्स :मुंबई