वायुसेना अधिक-यांना पीएच.डी.चे शिक्षण
By Admin | Updated: October 11, 2014 03:38 IST2014-10-11T03:38:04+5:302014-10-11T03:38:04+5:30
मुंबई विद्यापीठ आणि भारतीय वायुसेनेत सामंजस्य करार झाला असून, या करारान्वये वायुसेनेतील १० अधिकाऱ्यांना दरवर्षी एम.फील आणि पीएच.डी.चे शिक्षण दिले जाणार आहे.

वायुसेना अधिक-यांना पीएच.डी.चे शिक्षण
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे आफ्रिका अभ्यास केंद्र आणि मध्य युरेशिया अभ्यास केंद्राने भारतीय वायुसेनेतील अधिकाऱ्यांना एम.फील आणि पीएच.डी.चे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठ आणि भारतीय वायुसेनेत सामंजस्य करार झाला असून, या करारान्वये वायुसेनेतील १० अधिकाऱ्यांना दरवर्षी एम.फील आणि पीएच.डी.चे शिक्षण दिले जाणार आहे.
वायुसेनेतील अधिकाऱ्यांना धोरण निश्चितीच्या क्षेत्रात, जागतिक शांतता, मानवी सुरक्षा, दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंध, ऊर्जा सुरक्षा आणि धोरण, भारत - आफ्रिका संबंध या विषयांवर सखोल संशोधनासाठी आफ्रिका अभ्यास केंद्र आणि मध्य युरेशिया अभ्यास केंद्रामार्फत संशोधनाला वाव मिळणार आहे. याव्यतिरिक्त एमफील आणि पीएच.डी.च्या अंतर्गत लष्करी अभ्यास, एव्हीएशन, एरोनॉटीक्स, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विधी, समाजशास्त्र, उपयोजित मानव्यशास्त्र या विषयांवरही संशोधन करून धोरणनिश्चितीसाठी अधिकाऱ्यांना उपयोग होऊ शकेल. (प्र्रतिनिधी)