औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट सीईटी तारखा जाहीर
By Admin | Updated: March 3, 2015 02:50 IST2015-03-03T02:50:25+5:302015-03-03T02:50:25+5:30
तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) औषधनिर्माणशास्त्र आणि हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर केल्या आहेत.

औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट सीईटी तारखा जाहीर
मुंबई : तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत (डीटीई) औषधनिर्माणशास्त्र आणि हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेचे आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संचालनालयाकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
आगामी शैक्षणिक वर्षाचे औषधनिर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची (एम.फार्मसी) ‘एमएच-एमपीएच-सीईटी २०१५’ ही सामायिक परीक्षा रविवार, १७ मे रोजी, तर औषधनिर्माणशास्त्रची पदवी (एम.फार्मसी) प्रवेशासाठी ‘एमटी-सीईटी २०१५’ ही सामायिक प्रवेश परीक्षा २५ एप्रिल आणि २६ एप्रिलला घेण्यात येईल. तसेच हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी या पदवीसाठीची (बी.एचएमसीटी) ‘एमएएच-एचएम-सीईटी २०१५’ ही प्रवेश परीक्षा रविवार, २४ मे रोजी घेण्यात येईल. या परीक्षांसंदर्भात आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया व त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)