Join us  

पेट्रोल-डिझेल आणखी भडकलं... सलग 10व्या दिवशी दरवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 8:22 AM

कर्नाटकातील निवडणूक पार पडल्यानंतर सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

मुंबई - कर्नाटकातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. गगनाला भिडलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा भडका उडत आहे. दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर 85 रुपये तर डिझेल 72 रुपये 66 रुपये एवढे आहे. तर अमरावतीत पेट्रोल 86.22 रुपये तर डिझेल 73.94 रुपयांवर पोहोचले आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप होत आहे. दरम्यान,  केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. या बैठकीत पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.  या बैठकीत इंधन दरवाढीबाबत मोदी सरकार तोडगा काढणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

मोदी सरकारसमोर काय पर्याय?केंद्र सरकार पेट्रोलवर १९.४८ रुपये तर डिझेलवर १५.३३ रुपये उत्पादन कर लावते. हा कर कमी केला जाऊ शकतो. प्रत्येक राज्य वेगवेगळा व्हॅट आकारतात. महाराष्ट्रात ४६.५२ टक्के व्हॅट लावते. तो कमी केंद्राने सूचित केले होते. मात्र त्याला राज्यांनी प्रतिसाद दिला नाही. तिकीट दरांची संभाव्य वाढ रोखण्यासाठी हवाई इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणा, अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जीएसटी परिषदेकडे केली आहे. केंद्र सरकारने एक रुपयाने अबकारी कर कमी केल्यास महसुलाला १३ हजार कोटींचा फटका बसतो.

 

यूपीएपेक्षा अधिक दरयाआधी यूपीए सरकारच्या काळात २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल १४१ डॉलरवर असताना राज्याच्या काही भागात पेट्रोल ८५ रुपये प्रति लिटरवर गेले होते. आता मात्र कच्चे तेल ८०-८२ डॉलरदरम्यान असतानाच दर भडकले आहेत. यूपीए सरकारच्या काळात कच्चे तेल ८० डॉलर असताना पेट्रोल ६० व डिझेल ४८ रुपये प्रति लिटरच्या घरात होते.

मालवाहतूक महागणारमहाराष्ट्र मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने राज्यात डिझेल ६४ रुपये प्रति लिटर असताना भाड्याचा दर निश्चित केला. आता मात्र डिझेल ७२ रुपयांवर गेले आहे. दरवाढीमुळे दीर्घ पल्ल्याच्या फेऱ्यांच्या खर्चात ४००० रुपये प्रति फेरी वाढ झाली आहे. त्यामुळेच लांब पल्ल्याच्या ट्रकभाड्यात किमान २००० रुपये प्रति फेरी वाढ येत्या काळात होऊ शकते, असे असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद नाटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :पेट्रोलडिझेलकर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८