Join us

‘त्या’ घरावर याचिका; ‘म्हाडा’च्या लॉटरीतून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:42 IST

अर्जदारांना त्यांनी भरलेली रक्कम परत केली जाणार.

मुंबई : ‘म्हाडा’च्यामुंबई मंडळाच्या वतीने ४ हजार ८३ घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, या लॉटरीमधील संकेत क्रमांक ४६१ सावित्री निवास व लक्ष्मी निवास, दादर (पूर्व) या योजनेमधील सदनिकेबाबत उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे या सदनिकेसाठी संगणकीय प्रणालीद्वारे अर्जदारांची नोंदणी व अर्ज स्वीकृती थांबविण्यात येत आहे, अशी माहिती ‘म्हाडा’कडून देण्यात आली. आतापर्यंत या घरासाठी आठ अर्ज आले असून, या अर्जदारांना त्यांनी भरलेली रक्कम परत केली जाणार आहे. 

सदनिकेच्या विक्रीकरिता दलाल म्हणून नेमलेले नाहीत. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये. तसे केल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही. अशाप्रकारे कोणी व्यक्ती, दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी ‘म्हाडा’च्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, तसेच उपमुख्य अधिकारी यांना कळवावे. सोडतीत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in  याच ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा, असे ‘म्हाडा’ने म्हटले आहे.

२६ जूनच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज तर ऑनलाइन पेमेंट २६ जूनच्या रात्री ११.५६ वाजेपर्यंत करता येईल.आरटीजीएस/एनईएफटीद्वारे २८ जूनपर्यंत करता येईल.१८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढली जाईल.

टॅग्स :मुंबईम्हाडा