आवाजी मतदानाविरोधात हायकोर्टात याचिका
By Admin | Updated: November 15, 2014 01:55 IST2014-11-15T01:55:55+5:302014-11-15T01:55:55+5:30
विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना विधानसभेत झालेल्या आवाजी मतदानाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आह़े
आवाजी मतदानाविरोधात हायकोर्टात याचिका
मुंबई : विश्वासदर्शक ठराव मंजूर करताना विधानसभेत झालेल्या आवाजी मतदानाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आह़े
राजकुमार अवस्थी यांनी ही याचिका केली आह़े विश्वासदर्शक ठरावासाठी भाजपा सरकारने आवाजी मतदान घेतल़े मात्र हे विधानसभा नियमांच्या विरोधात आह़े कारण मुळात हे सरकार सत्ता स्थापनेसाठी पात्र आहे की नाही याची खातरजमा विधानसभा अध्यक्षांनी करायला हवी़ त्यामुळे हे आवाजी मतदान रद्द करून यासाठी नव्याने मतदान घ्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े या याचिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल व विधानसभा अध्यक्ष यांना प्रतिवादी करण्यात आले आह़े (प्रतिनिधी)