Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीटर मुखर्जीवर जे. जे. रुग्णालयात अँजिओप्लास्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 07:17 IST

शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून छातीत दुखत असल्याची तक्रार पीटरने केली होती.

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याला उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून छातीत दुखत असल्याची तक्रार पीटरने केली होती. सोमवारी पीटरवर जे. जे. रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली.शनिवारी संध्याकाळी छातीत जास्तच दुखत असल्याचे सांगितल्यानंतर तुरुंगाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. डॉ. सुरासे यांनी सांगितले की, अँजिओग्राफीदरम्यान एकापेक्षा जास्त ब्लॉकेज दिसून आले, त्यात चार ब्लॉकेज असून एकाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे सोमवारी अँजिओप्लास्टी केली. पीटरची प्रकृती आता स्थिर आहे.

टॅग्स :मुंबई