जेलमध्ये पीटर आणि भुजबळांची जमली मैत्री

By Admin | Updated: April 5, 2016 15:07 IST2016-04-05T13:48:51+5:302016-04-05T15:07:34+5:30

छगन भुजबळ आणि शीना बोरा हत्ये प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी सध्या आर्थर रोडमधल्या तुरुंगात

Peter and Bhujbal's close friendship in jail | जेलमध्ये पीटर आणि भुजबळांची जमली मैत्री

जेलमध्ये पीटर आणि भुजबळांची जमली मैत्री

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5- राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शीना बोरा हत्ये प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी सध्या आर्थर रोडमधल्या तुरुंगात कैद आहेत. तुरुंगात या दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमल्याची माहिती आता समोर आली आहे. 
2008 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळांनी ऑर्थर रोड तुरुंगात स्पेशल सेल उभारण्याचे आदेश दिले होते. याच स्पेशल सेलच्या बराक क्रमांक 12मध्ये छगन भुजबळ आणि पीटर मुखर्जीला ठेवण्यात आलं आहे. या स्पेशल सेलमध्ये सध्या छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम आणि पीटर मुखर्जीला ठेवलं आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अजमल आमीर कसाबलाही याच स्पेशल सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. कसाबच्या फाशीनंतर या सेलची विभागणी करण्यात आली.
 हवालामार्फत पैसे जमवल्याच्या आरोपाखाली भुजबळांची रवानगी या सेलमध्ये केली आहे. या स्पेशल सेलमध्ये भुजबळ आणि पीटर मुखर्जींची घट्ट मैत्री झाली आहे. पीटर मुखर्जींच्या घरातून येणारा डब्बा हे दोघं सोबत बसून एकत्र मिळून खात असल्याचीही माहिती आता उघड झाली आहे.  
 

Web Title: Peter and Bhujbal's close friendship in jail