भारतातील चहा उत्पादनामध्ये किटकनाशकांचे अवशेष - सर्वे

By Admin | Updated: August 12, 2014 17:19 IST2014-08-12T16:30:54+5:302014-08-12T17:19:08+5:30

भारतातील महत्वाच्या काही शहरांमध्ये विकल्या जाणा-या चहापत्तीमध्ये जीवघेणी किटकनाशकांचे अवशेष सापडल्याचा दावा एका एनजीओने सर्वेद्वारे केला आहे.

Pesticides residues in India's tea production - Survey | भारतातील चहा उत्पादनामध्ये किटकनाशकांचे अवशेष - सर्वे

भारतातील चहा उत्पादनामध्ये किटकनाशकांचे अवशेष - सर्वे

>ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १२ - भारतातील महत्वाच्या काही शहरांमध्ये विकल्या जाणा-या चहाच्या उत्पादनामध्ये जीवघेणी किटकनाशकांचे अवशेष सापडल्याचा दावा ग्रीनपीस या एनजीओने सर्वेद्वारे केला आहे. 
भारतातील दिल्ली, कोलकाता, बंगळूर, मुंबई सारख्या शहरामध्ये विकल्या जाणा-या ब्रॅन्डेड चहापत्तीमध्ये मोठया प्रमाणात किटकनाशकांचे अवशेष मिळाले असून हे अवशेष शरिरासाठी अपायकारक असल्याची माहिती सर्वे केलेल्या ग्रीनपीस एनजीओच्या प्रमूख नेहा सेहगल यांनी दिली आहे. त्या म्हणाल्या, जून २०१३ ते मे २०१४ या वर्षभरात भारतातील काही प्रमूख शहरामधून विकल्या जाणा-या ब्रॅन्डेड चहा उत्पादनाचा आमच्या एनजीओने सर्वे केल्यानंतर आम्हाला ही माहीती मिळाली आहे. आम्ही ४९ नमुन्याची (सॅम्पल ) चाचणी केली. त्यावेळी असे लक्षाल आले की, यामध्ये किटकनाशकांच्या औषधांच्या अवशेषांचा समावेश आहे. २९ नमुन्यांमध्ये जवळपास १० वेगवेगळया किटकनाशकांचा समावेश असल्याचे निदर्शनास आल्याचे सेहगल यांनी सांगितले. सेहगल पुढे म्हणाल्या, चहापत्तीमध्ये मिसळल्या जाणा-या   डीडीटीवर १०८९ साली बंदी घालण्यात आली आहे परंतू भारतातील काही नामवंत चहा विक्री करणारे ब्रँन्ड सध्याही त्याचा वापर करताना आढळतात. लोकांच्या शरिरावर अपायकारक परिणाम करणारे हे अवशेष यकृताला मोठे नुकसान पोहाचू शकते असे सेहगल यांनी सांगितले. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी चहा कंपनीने पुढे येण्याची गरज असून किटकनाशक अवशेष मिसळले जाणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे असेही सेहगल म्हणाल्या. 

Web Title: Pesticides residues in India's tea production - Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.