त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:06 IST2021-09-13T04:06:14+5:302021-09-13T04:06:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : साकीनाक्यातील खैरानी रोड येथे महिलेवर अत्याचार करून क्रूरतेने हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा ...

That person should be sentenced to death | त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी

त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : साकीनाक्यातील खैरानी रोड येथे महिलेवर अत्याचार करून क्रूरतेने हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी सबळ पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी जमात-ए-इस्लामी हिंद मुंबई महिला विभागातर्फे करण्यात आली आहे. याबाबत रविवारी साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकाची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळामध्ये मुंबई महिला विभागाची अध्यक्षा मुमताज नझीर शेख, शाखा अध्यक्षा डॉ.फरीदा कुंडलिक, आरेफा शाह आदींचा समावेश होता. पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी गुन्ह्याचा तपास तातडीने पूर्ण करावा, सबळ पुरावे सहआरोपपत्र दाखल करावे, जेणेकरून खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: That person should be sentenced to death