मंडपांना मिळेना परवानगी
By Admin | Updated: September 9, 2015 01:17 IST2015-09-09T01:17:25+5:302015-09-09T01:17:25+5:30
गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असताना असताना अद्यापही अनेक गणेश मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी मिळालेली नाही. मंडप उभारणीच्या परवानगीसाठी

मंडपांना मिळेना परवानगी
मुंबई : गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असताना असताना अद्यापही अनेक गणेश मंडळांना मंडप उभारण्यास परवानगी मिळालेली नाही. मंडप उभारणीच्या परवानगीसाठी एक हजार ५६४ मंडळांनी महापालिकेकडे अर्ज केले असून यापैकी ९४८ अर्ज विविध पोलीस ठाण्यांत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर महापालिकेने मंडप उभारणीचे २६२ अर्ज फेटाळले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने उत्सव काळात रस्त्यावर मंडप उभारण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिका आणि पोलिसांनी सुरु केली आहे. मुंबई महापालिका हद्दीत मंडप उभारण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी पालिका कार्यालय आणि पोलीस ठाण्यात हेलपाटे घालू लागले आहेत. मंडप परवानगीसाठी मुंबई महापालिकेच्या २४ विभागांकडे १ हजार ५६४ अर्ज आले आहेत. त्यामधील २६८ अर्ज निकाली काढले आहेत. तर २६२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अर्ज फेटाळण्यात आल्याने गणेश मंडळांना यंदाचा उत्सव भव्य मंडपाशिवाय साजरा करावा लागणार आहे.
एकूण एक हजार १३ मंडळांचे मंडप परवानगीचे अर्ज प्रलंबित आहेत. यामधील सर्वाधिक म्हणजे ९४८ अर्ज पोलिस ठाण्यांमध्ये प्रलंबित आहेत. तर ६५ अर्ज महापालिकेच्या विविध विभागांमध्ये प्रलंबित आहेत.