मतदानाचा टक्का वाढला
By Admin | Updated: October 15, 2014 22:56 IST2014-10-15T22:56:41+5:302014-10-15T22:56:41+5:30
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघामध्ये मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

मतदानाचा टक्का वाढला
अलिबाग : अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघामध्ये मतदान शांततेत पार पडले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे ७२ टक्के मतदान होण्याची शक्यता निवडणूक विभागाने वर्तविली आहे. सकाळी सात वाजल्यापासून अलिबाग-मुरुडमध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळी सात ते अकरा या कालावधीमध्ये २१.७० टक्के मतदानाची नोंद झाली होती. यावेळी युवकांसह वयोवृध्दांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजल्यानंतर गर्दी वाढू लागली.
विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बुथवर मतदारांना मार्गदर्शन करीत असल्याचे आढळले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी त्यांची एकच लगबग दिसून येत होती. शेकापचे उमेदवार सुभाष तथा पंडित पाटील, काँग्रेसचे मधुकर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश मोहिते, शिवसेनेचे महेंद्र दळवी, भाजपाचे प्रकाश काटे यासह अपक्ष उमेदवारांनी मतदान केले.