चोरांच्या टोळीच्या भीतीने नागरिकांची उडाली झोप

By Admin | Updated: December 22, 2014 01:04 IST2014-12-22T01:04:14+5:302014-12-22T01:04:14+5:30

वाडा-भिवंडी व शहापूर तालुक्यात १०० ते १५० जणांची चोरांची टोळी सक्रीय झाली असून घरफोडी करीत असल्याची अफवा तालुक्यात पसरली

The people of the thieves are afraid of the mob | चोरांच्या टोळीच्या भीतीने नागरिकांची उडाली झोप

चोरांच्या टोळीच्या भीतीने नागरिकांची उडाली झोप

वाडा : वाडा-भिवंडी व शहापूर तालुक्यात १०० ते १५० जणांची चोरांची टोळी सक्रीय झाली असून घरफोडी करीत असल्याची अफवा तालुक्यात पसरली असून त्यामुळे नागरिकांची झोप उडाली असून रात्रभर ग्रामस्थांनी जागता पहारा सुरू ठेवला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाडा-भिवंडी व शहापूर तालुक्यात १०० ते १५० जणांची चोरांची टोळी सक्रीय झाली असून ते घरफोड्या करीत आहेत. एवढेच नाही तर घरफोड्या करताना घरातील धान्य कोठारे घेऊन जात आहेत.
ही सशस्त्र बंदुकधारी टोळी असून यातील दोन पुरुष व एक स्त्री भिवंडी तालुक्यातील लाप गावात ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल. तर दिघाशी गावात अशी टोळी सक्रीय झाल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. तरुणांनी रात्रभर जागता पहारा ठेवला आहे.
शुक्रवारी रात्री ही टोळी मागाठणे, मोहट्याचा पाडा, ऊसर या परिसरात आल्याची अफवा सोशल मिडियावर पसरली आणि या परिसरातील शेकडो तरुणांनी संपूर्ण परिसर पालथा घातला. मात्र तिथे टोळी दिसली नाही.
यासंदर्भात वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्याशी संपर्क साधला असता चोरांच्या टोळीची अफवा पसरली असून वाडा तालुक्यात अशी एकही घटना घडली नसल्याची माहिती दिली आहे. (वार्ताहर)

Web Title: The people of the thieves are afraid of the mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.