Join us  

जनमानसांत ‘न्यूज १८ लोकमत’ ला पसंती, वृत्तवाहिनीच्या दोन वृत्तमालिकांची राज्य सरकारकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 5:59 AM

'News 18 Lokmat' : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची परवड आणि कोरोनाकाळात शाळा सुरू करणे, या दोन मुद्द्यांवर अलीकडेच ‘न्यूज१८ लोकमत’ वृत्तवाहिनीने वृत्तमालिका केली होती. या वृत्तमालिकांची राज्य सरकारने दखल घेत तातडीने आदेश जारी केले. 

मुंबई : सर्वसामान्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेत त्यासंदर्भातील वृत्तांकने तयार करून सरकारला त्यांची दखल घेण्यास भाग पाडण्याचे ‘न्यूज१८ लोकमत’चे कार्य जोमाने सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची परवड आणि कोरोनाकाळात शाळा सुरू करणे, या दोन मुद्द्यांवर अलीकडेच ‘न्यूज१८ लोकमत’ वृत्तवाहिनीने वृत्तमालिका केली होती. या वृत्तमालिकांची राज्य सरकारने दखल घेत तातडीने आदेश जारी केले. राज्यातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ‘पगाराचं बोला’ ही वृत्तमालिका ‘न्यूज१८ लोकमत’ने प्रसारित केली होती. राज्य सरकारने या वृत्तमालिकेची तातडीने दखल घेतली. त्यानंतर सरकारी सूत्रे वेगाने हलली आणि एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हक्काचा पगार मिळाला. कोरोनाकाळात राज्यातील शाळा बंद असताना काही ठिकाणी  शाळा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यावर राज्यातील पालक आणि विद्यार्थी यांच्यातर्फे ‘न्यूज१८ लोकमत’ने आवाज उठवला. राज्य सरकारने या वृत्तमालिकेची दखल घेत शाळा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू न करण्याचे आदेश दिले. (वा.प्र.) 

टॅग्स :माध्यमेमहाराष्ट्र