Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील 'या' सोसायटीतील लोक उतरले रस्त्यावर; वनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या विरोधात दिल्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 08:20 IST

या प्रकरणामुळे परिसरात अनिता पाटील यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी या सर्व मुद्द्यांवर तातडीने लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या मनमानी कारभाराविरोधात अभिनव नगर येथील स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन केले. अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या कामकाजाबाबत परिसरात मोठा असंतोष निर्माण झाला.त्यांच्या मनमानी कारभाराचा फटका स्थानिक रहिवासी आणि आदिवासी बांधवांना बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.अभिनव नगर या उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या जागेत वनसंरक्षकांच्या आदेशानुसार जवळपास 2250 चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राज सुर्वे यांनी केले होते.

या प्रकरणामुळे परिसरात अनिता पाटील यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी या सर्व मुद्द्यांवर तातडीने लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कामकाजाबाबत परिसरात मोठा असंतोष निर्माण झाल्याचे येथील आदिवासी बांधव व आंदोलकांचे म्हणणे आहे. 

अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या घरांवर त्यांच्याकडे पुरावे आणि कागदपत्रे असतानाही तोडक कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि दगडफेकीची घटना देखील घडली होती.

तसेच उद्यान परिसरात पर्यटकांना सेवा देत अनेक वर्षे आपल्या उपजीविकेचा आधार निर्माण केलेल्या स्थानिकांच्या वाहनांवरही निर्बंध घालण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली असून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

अनिता पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या खात्यात आपली बदली करून घेतली, तर काहींनी त्यांच्या नोकरीला रामराम ठोकला होता, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Society Residents Protest Against Forest Officer's Alleged Autocracy.

Web Summary : Abhinav Nagar residents protested against Forest Conservator Anita Patil's alleged autocratic rule, citing unauthorized construction and harassment of locals and tribal communities. They demand intervention from the Chief Minister and Forest Minister to resolve the issues; otherwise, they threaten further agitation.