Join us  

रेल्वे आरक्षण केंद्र बंदच असल्याने लोकांचा संताप, प्रवाशांचे अडकले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 7:08 PM

वाहनं बंद असल्याने लोकं चालत आली होती. काहीजण आरक्षित तिकीट काढायचे म्हणून आले होते.

मीरारोड - रेल्वे आरक्षण तिकिटं काढण्यासाठी तसेच आधी काढलेली तिकिटं रद्द करण्यासाठी भाईंदरच्या रेल्वे आरक्षण केंद्रावर जमलेल्या लोकांनी केंद्रच बंद असल्याने संताप व्यक्त केला. रेल्वेची तिकीट आरक्षण केंद्र आज शुक्रवार पासून उघडणार असल्याचे कळल्यावर लोकांनी सकाळ पासूनच भाईंदर येथील आरक्षण केंद्रा कडे धाव घेतली. परंतु आरक्षण केंद्र बंदच होते व त्या बाबत माहिती देण्यास कोणी उपस्थित देखील नसल्याने लोकं संतापली. 

वाहनं बंद असल्याने लोकं चालत आली होती. काहीजण आरक्षित तिकीट काढायचे म्हणून आले होते. तर काही जण पूर्वी आरक्षित केलेली तिकिटं रद्द करून आपले अडकलेले पैसे परत घेण्यासाठी आले होते. परंतु आरक्षण केंद्रच बंद असल्याने बराच वेळ ताटकळत थांबल्या नंतर लोकं परत जात होते. मूळच्या पश्चिम बंगाल च्या एका प्रवाशाने सांगितले की, मी तिकीट काढली होती ज्याची प्रवासाची तारीख निघून गेली आहे. लॉकडाऊनमूळे आपल्या कडे पैसे राहिले नसून रेल्वेत अडकलेले आरक्षणाचे 6 हजार रुपये परत घेण्यासाठी आलो होतो. पण केंद्रच बंद असून आम्ही खायचे काय ? आणि गावी जायचे कसे ? रेल्वेची मनमानी असून सामान्य जनतेची यांना फिकीर नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईरेल्वे