शुल्क स्वीकारूनही पर्ा्िक ग न देणा:या ओम शांती टॉवरला दंड
By Admin | Updated: November 26, 2014 23:14 IST2014-11-26T23:14:15+5:302014-11-26T23:14:15+5:30
पर्ा्िकगसाठी शुल्क आकारूनही ती सुविधा न देणा:या ‘ओम शांती टॉवर को-ऑप हौसिंग सोसायटी’ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 95 हजाराचा दंड ठोठावला आहे.

शुल्क स्वीकारूनही पर्ा्िक ग न देणा:या ओम शांती टॉवरला दंड
ठाणो : पर्ा्िकगसाठी शुल्क आकारूनही ती सुविधा न देणा:या ‘ओम शांती टॉवर को-ऑप हौसिंग सोसायटी’ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 95 हजाराचा दंड ठोठावला आहे.
रहिवासी संगीता शर्मा यांनी सोसायटीने सांगितल्याप्रमाणो जानेवारी 2क्क्8 मध्ये पर्ा्िकगसाठी 2क् हजार धनादेशाने जमा केले होते. त्यानुसार त्यांनी 1 मार्च 2क्क्9 रोजी पर्ा्िकगची सेवा घेतली. त्यानंतर काही दिवसांनी सोसायटीने शर्मांना त्यांचे वाहन दिलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य जागेवर उभे करण्यास सांगितले. त्यामुळे शर्मा यांनी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केली. तेव्हा शर्मांचा धनादेश वटवून घ्यावा आणि त्यांना वैयक्तिक पर्ा्िक गची सेवा द्यावी,असा आदेश उपनिबंधकांनी दिला. त्यानंतरही मार्च 2क्क्9 मध्ये त्यांचे वाहन सोसायटीने त्रयस्थ व्यक्तीच्या मदतीने अन्यत्र उभे केले. यात वाहनाचे नुकसानही झाले. त्यामुळे शर्मा यांनी सोसायटीविरोधात मिरारोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. सोसायटीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून आर्थिक नुकसान म्हणून 95 हजारांची मागणी केली. तर शर्मा यांनी जानेवारी 2क्क्4 ते फेब्रुवारी 2क्क्9 र्पयतचे मासिक देखभाल दुरूस्ती देयक दिलेले नाही. तसेच त्यांनी धनादेशावर तारीख टाकली नसल्याने त्यांचे वाहन पर्ा्िकग जागेतून काढण्यास सांगितले आणि ते त्यांनीच काढले. त्यामुळे सोसायटी याला जबाबदार नाही,असे सांगून सोसायटीने ही तक्रार अमान्य करण्याची मागणी केली.
कागदपत्रे, घटना यांची पडताळणी केल्यावर शर्मा यांनी सोसायटीला 1 मार्च 2क्क्9 ला धनादेशाने 2क् हजार दिले.एप्रिल 2क्11 मध्ये सोसायटीने दिलेल्या पत्रत शर्मा यांचा धनादेश वटविण्यासाठी टाकल्याचे नमूद आहे.
त्यामुळे शुल्क घेऊन त्यांच्या वैध पर्ा्िकग जागेत सोसायटीने त्रयस्थाला पर्ा्िकगची परवानगी देणो अयोग्य आहे. तसेच शर्मानी मासिक देखभाल दुरूस्ती देयक दिले नसले तरी वाहन पर्ा्िकगशी याचा संबंध नाही, असे मंचाने स्पष्ट केले.
त्यामुळे सोसायटीने त्यांना वैध जागेत पर्ा्िकगची सोय करून द्यावी.तसेच नुकसानभरपाई म्हणून त्यांना 95 हजार द्यावे,असा आदेश मंचाने दिला आहे. यामुळे अनेक सोसायटय़ांतील त्रस्त फ्लॅटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(प्रतिनिधी)
4शुल्क घेऊन त्यांच्या वैध पर्ा्िकग जागेत सोसायटीने त्रयस्थाला पर्ा्िकगची परवानगी देणो अयोग्य आहे. तसेच शर्मानी मासिक देखभाल दुरूस्ती देयक दिले नसले तरी वाहन पर्ा्िकगशी याचा संबंध नाही, असे मंचाने स्पष्ट केले.