शिक्षण विभागातील अधिकाऱ्यास दंड

By Admin | Updated: June 27, 2015 22:45 IST2015-06-27T22:45:19+5:302015-06-27T22:45:19+5:30

माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास विलंब केल्याप्रकरणी कोकण खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तांनी रायगड जिल्हा शिक्षण विभागाचे (माध्यमिक)

Penalty for the Education Department officials | शिक्षण विभागातील अधिकाऱ्यास दंड

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यास दंड

पनवेल : माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास विलंब केल्याप्रकरणी कोकण खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तांनी रायगड जिल्हा शिक्षण विभागाचे (माध्यमिक) जन माहिती अधिकारी तथा प्रभारी उपशिक्षणाधिकारी यांना एक हजार रु पये दंड भरण्याचे आदेश दिले आहे.
खारघरमधील शारदा टायपिंग इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी संजय पाटील यांनी खारघरमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या स्कॉलर टायपिंग इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी केलेल्या तपासणीच्या वेळी इन्स्टिट्यूटने शिक्षण मंडळाकडे सादर केलेले दस्तावेजची साक्षांकित प्रत त्यांनी माहिती रायगड जिल्हा शिक्षण विभागाचे (माध्यमिक विभाग) जन माहिती अधिकारी तथा प्रभारी उपशिक्षणाधिकारी प्रकाश अनंत कोकाटे यांच्याकडे मागितली. मात्र कोकाटे यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पाटील यांनी कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त टी. एफ. थेकेकरा यांच्याकडे अपील केले होते. आयुक्तांनी सुनावणी घेऊन माहितीस विलंब केल्याप्रकरणी कोकाटे यांना एक हजार रु पये दंड भरण्याचे आणि पंधरा दिवसांत विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले आहे.

Web Title: Penalty for the Education Department officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.