साथींनी पुन्हा काढले डोके वर!
By Admin | Updated: October 31, 2014 00:26 IST2014-10-31T00:26:53+5:302014-10-31T00:26:53+5:30
नागरिकांमध्ये साथीच्या रोगांविषयी जनजागृतीचा अभाव, परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य आणि वातावरणातील बदल याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

साथींनी पुन्हा काढले डोके वर!
पूनम गुरव ल्ल नवी मुंबई
नागरिकांमध्ये साथीच्या रोगांविषयी जनजागृतीचा अभाव, परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य आणि वातावरणातील बदल याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यातच नवी मुंबई शहरात डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या दहा महिन्यांत 265 मलेरियाचे रुग्ण आणि 46 डेंग्यूचे संशयित रुग्ण नवी मुंबईतील विविध परिसरात आढळले आहेत.
सध्या पावसाने विo्रांती घेतली असली, तरी सतत वातारणामध्ये होणारा बदल, घाणीचे साम्राज्य आणि जास्त दिवस साठवून ठेवलेल्या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर गेल्या दहा महिन्यांमध्ये ताप आला म्हणून रक्त नमुने तपासणी करणा:या रुग्णांची संख्या 8क्,555 वर पोहचली आहे. यातील विविध साथीच्या आजारांच्या पॉङिाटिव्ह रुग्णांवर मनपा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र साथीच्या आजारामुळे एकही रुग्ण दगावला नसल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिका:यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यापासून मलेरिया आणि डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत प्रामुख्याने वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 1क्, सप्टेंबरमध्ये- 18 आणि ऑक्टोबरमध्ये 9 डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. यात ऑक्टोबरमध्ये 2 पॉङिाटिव्ह डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. घणसोली, इंदिरानगर, करावे, शिरवणो, नेरूळ , कोपरखैरणो, आणि तुभ्रे नागरी आरोग्य केंद्रातील परिसरामध्ये मलेरिया तर दिघा आणि महापे नागरी आरोग्य केंद्र परिसरामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या इतर विभागाच्या तुलनेत अधिक आहे. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय, स्थलांतरित केलेले मनपाचे तीन बाल माता रुग्णालय, 11 नागरी आरोग्य केंद्र आणि तीन नवीन हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या ओपीडीच्या माध्यमातून ही तापाच्या रुग्णांवर उपाचार सुरू असून याठिकाणी ताप थंडीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सध्या सर्व ठिकाणी फक्त एनएस-1 ही प्रथम चाचणी केल्यानंतर लगेच काही डॉक्टर डेंग्यूची लागण झाल्याचे सांगतात. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यूची लागण झाल्याची भीती निर्माण झाली आहे. वास्तविक आयजीएम रक्ताची चाचणी केल्यानंतर डेंग्यूचा रुग्ण पॉङिाटिव्ह समजून त्यांच्यावर उपचार करण्यात येतात.आरोग्य विभागाच्यावतीने पावसाळय़ाअगोदरपासून साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
- डॉ. दीपक परोपकारी, वैद्यकीय अधिकारी, मनपा आरोग्य आरोग्य विभाग.
च्नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मे महिन्यापासून साथीच्या आजाराविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. डास उत्पत्ती मोहीम, साप्ताहिक डास अळीनाशक, रासायनिक धुरीकरण पावसाला सुरुवात होण्याअगोदरच के ली जाते.
च्पावसाळय़ात साथीच्या आजाराविषयी 5 वेळा सर्वेक्षण केले जाते. 45 मल्टिपर्पज डॉक्टर आणि बहुउद्देशीय कर्मचारी घरोघरी जावून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत. त्याचबरोबर मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या आणि आजूबाजूच्या 1क्क् घरांमध्ये औषध फवारणी केली जात आहे.