Join us

‘महिन्याला दोन हजार द्या, बेकायदा पार्किंग करा’; नो पार्किंग, डबल पार्किंगमधून अनधिकृत कमाई

By मनीषा म्हात्रे | Updated: March 26, 2025 05:50 IST

धारावी स्फोट प्रकरणात अनधिकृत पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: धारावी स्फोट प्रकरणात अनधिकृत पार्किंगचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. तरबेज शेख नावाची व्यक्ती या जागेवर अनधिकृतपणे पैसे उकळत होती. गॅस एजन्सीच्या ट्रक, टेम्पो चालकाकडून महिन्याला हजार ते दोन हजार घेत नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर आले. ‘नो पार्किंग तसेच डबल पार्किंग’मध्ये वाहने लावणाऱ्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असून गेल्या तेरा महिन्यांत अडीच हजार ई-चलन जारी करत कारवाई केली आहे. 

वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात नो पार्किंग तसेच डबल पार्किंग संबंधित २१५३ चलन बजावत कारवाई केली. यावर्षी २४ मार्चपर्यंत ३९१ चलन जारी केले आहे.  धारावी येथील घटनास्थळावर गेल्या अनेक दिवसांपासून तरबेज शेख हा येथे वाहन पार्क करण्याचे पैसे घेत होता. यात रिक्षा चालकाकडून चाळीस ते शंभर रुपये उकळत होता. तर, गॅस एजन्सीच्या ट्रक, टेम्पोकडून महिन्याला हजार ते दोन हजार रुपये घेत होता असे चौकशीत समोर आले. याबाबत त्याच्याकडेही चौकशी सुरू आहे. येथील डबल पार्किंगविरुद्ध वाहतूक पोलिस आणि धारावी पोलिसांकडूनही वेळोवेळी कारवाई करण्यात आल्याचे धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिडकर यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांनी चलनाद्वारे केलेली कारवाई

कारवाई    २०२४    २०२५    एकूण नो पार्किंग    १,०३४    २४६    १,२८०डबल पार्किंग    १,११९    १४५    १,२६४

टॅग्स :पार्किंगपोलिस