Join us
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतराचा वाद सुरू असतानाच पवार अन् फडणवीस एकाच व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 06:03 IST

पक्षांतराच्या मुद्दयावरून सध्या मुख्यमंत्री आणि पवार यांच्यामध्ये जुंपली आहे.

मुंबई : माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर असणार आहेत.

पक्षांतराच्या मुद्दयावरून सध्या मुख्यमंत्री आणि पवार यांच्यामध्ये जुंपली आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहातील या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन जाधव लिखित विधानगाथेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. तर, शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. 

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीस