पूर्वीच्या भांडणातून डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:12+5:302021-02-05T04:28:12+5:30

मुंबई : पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चेंबूर परिसरात सत्यपाल टिलगामे (२३) या तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातल्याची घटना रविवारी घडली. ...

Paver block laid in the head from an earlier quarrel | पूर्वीच्या भांडणातून डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

पूर्वीच्या भांडणातून डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

मुंबई : पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चेंबूर परिसरात सत्यपाल टिलगामे (२३) या तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातल्याची घटना रविवारी घडली. यात सत्यपाल गंभीर जखमी असून, त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी घरमालक मोहित नांंदोस्कर यांच्या फिर्यादीवरून आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

.......................................

मेडिकलमधून ३ लाखांची रोकड चोरीला

मुंबई : पायधुनी येथील एका मेडिकलचे शटर तोडून ३ लाख रुपयांची रोकड पळविण्यात आली. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पाेलीस अधिक तपास करीत आहेत.

.......................................

दाेन दलालांना पाेलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविणाऱ्या दोन दलालांना डी. बी. मार्ग पोलिसांनी रविवारी अटक केली. क्रिष्णा काळे जया रंगम्मा गौडा (३४) आणि सादिक इमाम हुसेन शेख (२७), अशी अटक करण्यात आलेल्या दाेघांची नावे असून, पाेलीस त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहेत.

.................................

घाेडपदेव येथे घरातून मोबाइल पळविला

मुंबई : घोडपदेव येथे राहणारा ओमकार वरे (१९) हा तरुण घरात झोपला असताना, चोराने घरातील माेबाइल पळविला. चाेराला पाहताच बहिणीने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने ओमकार उठला व त्याने चाेराचा पाठलाग केला. मात्र, ताे पळून गेला. रविवारी याप्रकरणी भायखळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

...................................

गावठी कट्टा जप्त; तरुणाला अटक

मुंबई : भायखळा परिसरातून बप्पा परितोश सरकार (२८) या तरुणाकडून गावठी कट्टा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. शनिवारी आग्रीपाडा पोलिसांनी ही कारवाई केली असून, बप्पाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

..........................

Web Title: Paver block laid in the head from an earlier quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.