देशप्रेमी तरुण हेच भारताचे भवितव्य-हवालदार मेजर शत्रुघ्न महामुणकर

By मनोहर कुंभेजकर | Published: January 26, 2024 07:32 PM2024-01-26T19:32:35+5:302024-01-26T19:34:03+5:30

विद्यार्थ्यांनी शानदार संचलन, स्वागत गीत, लेझीम नृत्य, रोप कवायत सादर केली .देशभक्तीपर गाणी गायली व भाषणे केली.

Patriotic youth is the future of India Constable Major Shatrughan Mahamunkar | देशप्रेमी तरुण हेच भारताचे भवितव्य-हवालदार मेजर शत्रुघ्न महामुणकर

देशप्रेमी तरुण हेच भारताचे भवितव्य-हवालदार मेजर शत्रुघ्न महामुणकर

मुंबई- विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त पाळणे फार महत्त्वाचे आहे. देशप्रेमी तरुण हेच भारताचे भवितव्य व आशा आहे. चांगले नागरिक बना. मैदानी खेळ खेळा. स्वछता पाळा व नशामुक्त रहा."असे मार्गदर्शनपर उदगार कारगील विजेता हवालदार मेजर शत्रुघ्न महामुणकर यांनी काढले. 

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित बालविकास विद्या मंदिर व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल, जोगेश्वरी(पूर्व) येथे भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी बालविकास विद्या मंदिर व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन, स्वागत गीत, लेझीम नृत्य, रोप कवायत सादर केली .देशभक्तीपर गाणी गायली व भाषणे केली. यावेळी शालेय व आंतरशालेय स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख बक्षिसे देण्यात आली. संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनीसुध्दा यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन गौरविले. 

संस्थेचे उपकार्याध्यक्ष  जनार्दन विश्वासराव व संस्थेचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलचे चेअरमन सहदेव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाला सुरक्षा घोसाळकर, चिटणीस यशवंत साटम, प्रशासकीय अधिकारी अशोक परब, कार्यकारिणी सदस्य जयंत गुजर व विनोद बने , बालविकास विद्या मंदिर पुर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  सुविधा शिर्के, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  सुषमा सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक  जगदीश सुर्यवंशी, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शबनम हुल्लर , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डिंपल दुसाणे सर्व शिक्षक व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अबिदा नाईक, पुनम सावंत, अर्चना जाधव,  वंदना धोडी,निकीता चौधरी यांनी केले.

Web Title: Patriotic youth is the future of India Constable Major Shatrughan Mahamunkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई