दिवसाला हरवतो एक रुग्ण

By Admin | Updated: September 17, 2014 00:56 IST2014-09-17T00:56:14+5:302014-09-17T00:56:14+5:30

दिवसाला एक रुग्ण केईएम रुग्णालयातून हरवत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

A patient who loses the day | दिवसाला हरवतो एक रुग्ण

दिवसाला हरवतो एक रुग्ण

पूजा दामले ल्ल मुंबई
आजार बरा होत नाही, खूपच आजारी असल्यामुळे नातेवाईक  भेटायला येत नाहीत किंवा औषध आणायला आता पैसे नाहीत, मानसिक संतुलन बिघडले आहे, अशा अनेक कारणांमुळे परळच्या केईएम रुग्णालयातून रुग्ण हरवण्याच्या (निघून जाण्याच्या) घटना या नेहमीच घडत असतात. या घटनांची सरासरी काढल्यास दिवसाला एक रुग्ण केईएम रुग्णालयातून हरवत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
केईएम रुग्णालयामध्ये अनेक प्रकारचे रुग्ण दाखल होत असतात. प्रत्येक रुग्णाबरोबर किमान एक नातेवाईक असणो अपेक्षित असते. प्रत्येक रुग्णाच्या नातेवाइकाला एक पास दिला जातो. यामागचे कारण म्हणजे रुग्णाला बरे करण्याची जबाबदारी ही रुग्णालयाची असते. त्याच्याकडे वॉर्डातील डॉक्टर, परिचारिका लक्ष देतात. पण प्रत्येक रुग्णाकडे लक्ष देणो शक्य होत नाही. केईएम रुग्णालयामध्ये सुमारे 1 हजार 8क्क् रुग्ण दाखल असतात. प्रत्येक रुग्ण कुठे जातो, काय करतो याकडे रुग्णाच्या नातेवाइकाने लक्ष ठेवणो अपेक्षित आहे, अशी रुग्णालय प्रशासनाची भूमिका आहे. रुग्ण हरवला आहे, अशा तक्रारी आमच्या सुरक्षारक्षक कार्यालयात येतात. यानंतर त्याची लेखी तक्रार पोलिसांकडे होते. या सर्व घटनांची सरासरी काढल्यास दर दिवशी केईएम रुग्णालयातून एक रुग्ण हरवल्याची तक्रार येत असते. 
रविवारी संध्याकाळी एक 27 वर्षीय पूजा तिवारी नामक मुलगी केईएम रुग्णालयातून हरवली होती. पूजा ही वॉर्ड क्रमांक चारमध्ये दाखल होती. तिच्यावर मानसोपचातज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. ती मुलगी हरवली तेव्हा तिच्याबरोबर एक नातेवाईक होता. मात्र तो काही तरी कामासाठी गेला असताना ती हरवली आणि आता ती तिच्या घरी उत्तर प्रदेशमध्ये गेली असल्याचे तिच्या नातेवाइकाने सांगितले. केईएम रुग्णालयात या घटना घडत असतातच. अनेकदा रुग्ण हे स्वत:च्या घरी निघून जातात. कधी कधी पैसे नसतात, म्हणूनही हे रुग्ण निघून जातात. 
 
च्केईएम रुग्णालयाला एकूण 8 प्रवेशद्वारे आहेत. हजारो लोक येथे येत असतात. मग प्रत्येकावर लक्ष ठेवणो शक्य होत नाही. सगळ्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही आहेत. 
च्मात्र त्यातून रुग्ण शोधणो सहज शक्य नाही. कारण तिथेही खूप गर्दी असते, असे सुरक्षारक्षकांचे म्हणणो आहे. यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णांकडे लक्ष दिले पाहिजे. केईएम रुग्णालयात सुरू असलेल्या कामामुळे तिथले काही सीसीटीव्ही बंद आहेत. काम पूर्ण झाल्यावरच हे सीसीटीव्ही सुरू होतील, असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणो आहे.  

 

Web Title: A patient who loses the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.