रुग्णांचा चढता आलेख

By Admin | Updated: August 13, 2014 00:33 IST2014-08-13T00:33:07+5:302014-08-13T00:33:07+5:30

नुकत्याच झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर वसई, नालासोपारा, वसई गाव व नवघर - माणिकपूर शहरात आजारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

Patient extending graph | रुग्णांचा चढता आलेख

रुग्णांचा चढता आलेख

वसई : नुकत्याच झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर वसई, नालासोपारा, वसई गाव व नवघर - माणिकपूर शहरात आजारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. डायरिया, मलेरिया, गॅस्ट्रो, कावीळ व अन्य रोगांचा फैलाव झाला आहे.
गेल्या महिन्यात वसई - विरार परिसरात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळले होते. त्यापैकी काही रुग्णांनी मुंबई परिसरात उपचार घेतले. आता डायरिया, मलेरिया, गॅस्ट्रो व कावीळ या रोगांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे.सरकारी रुग्णालयासमवेत खाजगी इस्पितळे रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. महानगरपालिका प्रशासनही निरनिराळ्या स्तरावर उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी घरातील शिळे पाणी अधिक काळ घरात ठेवू नये, असे आवाहन केले आहे. सध्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्व्हे केला जात आहे. त्यामध्ये कुठलाही तापाचा रुग्ण आढळल्यास त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. तसेच सध्या आरोग्य विभागाच्या वतीने औषध व धूरफवारणी केली जात आहे. सध्या पालिकेच्या तसेच खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Web Title: Patient extending graph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.