मुंबई - रायगड येथील खालापूरधील कंपनीच्या जमिनींवर अतिक्रमण करण्यात आल्याने ते हटविण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका बाब रामदेव यांच्या पंतजली फूड्स प्रा.लि.ने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. :पंतजली फूड्स प्रा.लि.च्या मालकीच्या जमिनींचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. या जमिनींवर अतिक्रमण करून दुकाने उघडण्यात आली आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेनुसार सुनील मालुसरे, मयूर देवघरे आणि सुदेश खंडागळे यांनी अनुक्रमे राजकीय पक्षाचे कार्यालय, हॉटेल आणि टायर शॉप उघडले आहे.
अतिक्रमणाविरोधात पंतजली उच्च न्यायालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 09:11 IST