प्रवासी बनून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक

By Admin | Updated: May 31, 2015 22:54 IST2015-05-31T22:54:08+5:302015-05-31T22:54:08+5:30

प्रवासी म्हणून ट्रकमध्ये बसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून क्लीनर तसेच चालकाकडून पैसे लुटणाऱ्या चारपैकी दोन दरोडेखोरांना मनोर पोलिसांनी भोपोलीच्या

Passengers of the robbers robbed robbers | प्रवासी बनून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक

प्रवासी बनून लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक

मनोर : प्रवासी म्हणून ट्रकमध्ये बसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून क्लीनर तसेच चालकाकडून पैसे लुटणाऱ्या चारपैकी दोन दरोडेखोरांना मनोर पोलिसांनी भोपोलीच्या जंगलात पकडले. दोन फरार दरोडेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.
दिनेश कुमार श्रीप्रसाद (२०), बबलू राम चौरसिया (३२) आणि इतर दोघे असे एकूण चौघे बोईसर येथे एका ट्रकमध्ये प्रवासी म्हणून बसले. ट्रक मनोर-विक्रमगडमार्गे जात असताना भोपोली गावाच्या हद्दीत रात्री ८ वा.च्या सुमारास जंगलामध्ये गाडी थांबवायला सांगितले. त्या चौघांनी वाहनचालक व क्लीनर यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच क्लीनरला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ९५०० रु. काढून घेतले.
चालकाचा मोबाइल घेतला आणि जंगलात पळाले. घटनेची माहिती मनोर पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने जंगलामध्ये सापळा रचला. त्या वेळी दिनेश व बबलू या दोघांना पकडण्यात यश आले.
दरोडेखोरांचे मोठे रॅकेट आहे. असे प्रकार त्यांनी अनेक रस्त्यांवर केले असतील. त्यांचा मुख्य आरोपी हातात लागला तर अनेक गुन्हे उघडकीस येतील, अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर मुख्य आरोपीला पकडण्यात येईल, असे सहा. पो.नि. मारुती पाटील यांनी लोकमतला सांगितले. मनोर पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. (वार्ताहर)

Web Title: Passengers of the robbers robbed robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.