Join us  

मुंबई विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची भिस्त अजूनही खासगी वाहनांवरच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 6:30 PM

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या व तिथून येणाऱ्या प्रवाशांनी शुक्रवारी देखील खासगी वाहनांचा पर्यायच निवडला. 

 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या व तिथून येणाऱ्या प्रवाशांनी शुक्रवारी देखील खासगी वाहनांचा पर्यायच निवडला. लॉकडाऊन मधील अटी व शर्ती शिथिल करुन टँक्सी सेवेला परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप पुरेशा प्रमाणात टँक्सी, रिक्षा रस्त्यावर आलेल्या नाहीत. त्यामुळे हवाई प्रवासासाठी घरातून निघालेल्या व हवाई प्रवास करुन आलेल्या प्रवाशांनी आरक्षित केलेल्या वाहनांद्वारे प्रवास करण्यास प्राधान्य दिले. 

मुंबईविमानतळावरुन शुक्रवारी 48 विमानांची वाहतूक झाली. त्यामध्ये देशाच्या विविध भागातून मुंबईला आलेल्या 24 विमानांचा व मुंबईतून देशाच्या विविध भागात गेलेल्या 24 विमानांचा समावेश होता. मुंबईत टँक्सी वाहतूक सुरु करण्यास राज्य सरकारने सशर्त परवानगी दिली असली तरी प्रवाशांनी सध्या तरी खासगी वाहनाने विमानतळापर्यंत जाणे व येणे पसंत केल्याचे चित्र आहे. पूर्ण क्षमतेने ही सेवा सुरु होती पर्यंत या सेवेकडे प्रवासी वळणार नाहीत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावरुन देशांतर्गत हवाई वाहतुक पूर्ण क्षमतेने करण्यास राज्य सरकारची परवानगी मिळाल्यावर विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरु  होईल व रिक्षा टँक्सी सेवेला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल त्यामुळे ही सेवा लवकर सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :विमानतळकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई