मुंबई : पालिका निवडणुकीसाठी मंगळवारी निवडणूक कार्यालयाबाहेर वेगवेगळ्या पक्ष कार्यकर्त्यांनी एकप्रकारे छावण्याच टाकल्या होत्या. उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी अर्ज भरताना काँग्रेस, उद्धवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही कांदिवली, बोरीवली, मागाठाणे, चारकोप येथे मोठा उत्साह दिसून आला.
कांदिवली पूर्व, चारकोप, बोरीवली, दहिसर, मागाठाणे येथे भाजप आमदारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात आले. मनसे - उद्धवसेनेची युती असल्याने बऱ्याच प्रभागात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्या उमेदवारांना पाठिंबा दिला. काँग्रेसच्या अजंता यादव यांनी प्रभाग २८ मधून, तर प्रभाग २५ आणि २६ मधून उद्धवसेना- मनसे युतीचे उमेदवार योगेश भोईर आणि धर्मेंद्र काळे यांनी अर्ज दाखल केले.
संवादही साधला नाहीविधानसभेसाठी उभे राहिलेले मात्र हरलेले उमेदवार यावेळी नगरसेवक पदासाठी आपले नशीब अजमवत आहेत. मात्र त्यामुळे मनसे-उद्धवसेनेतील बऱ्याच इच्छुकांना उमेदवारी मिळालेली नाही. पदांचे राजीनामे देण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. ऐनवेळी पक्षाकडून दुसऱ्याच उमेदवाराला संधी देत, आमच्याशी संवादही साधला गेला नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांची नाराजीमागाठाणे मतदारसंघात प्रभाग ३ मध्ये भाजपकडून प्रकाश दरेकर यांना उमेदवारी दिली. शिंदेसेनेला ही जागा हवी असल्याने कार्यकर्त्यांनी आ. प्रकाश सुर्वेंविरोधात निदर्शने केली.शिंदेसेनेच्या वैष्णवी पुजारी यांना डावलल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत काही काळ ठिय्या दिला होता.
Web Summary : Mumbai civic polls saw party camps outside election offices. Defeated assembly candidates are now contesting corporator elections, sidelining many aspirants. This sparked discontent, with some workers protesting candidate selections, feeling ignored by party leadership.
Web Summary : मुंबई पालिका चुनाव में चुनाव कार्यालयों के बाहर पार्टी शिविर लगे। विधानसभा में हारे उम्मीदवार अब पार्षद चुनाव लड़ रहे हैं, जिससे कई इच्छुक पीछे रह गए। इससे असंतोष फैल गया, कुछ कार्यकर्ताओं ने उम्मीदवार चयन का विरोध किया, पार्टी नेतृत्व द्वारा उपेक्षित महसूस किया।