पार्टी आॅल नाईट

By Admin | Updated: December 29, 2014 22:49 IST2014-12-29T22:49:16+5:302014-12-29T22:49:16+5:30

थर्टी फर्स्ट म्हटले की एकच जल्लोष. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळेच आतुर होऊन जातात.

Party Hall Night | पार्टी आॅल नाईट

पार्टी आॅल नाईट

थर्टी फर्स्ट म्हटले की एकच जल्लोष. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळेच आतुर होऊन जातात. हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असला तरी थर्टी फर्स्टची झिंग भल्याभल्यांना आवरता येत नाही. सध्या काहीसे असेच वातावरण आहे. थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे, पिकनिकचे नियोजन करण्यासाठी फॅमिली, मित्रवर्ग, कॉलेज ग्रुप्स कामाला लागले असून दिवसरात्र सध्या यावर चॅटिंग, डिस्कशन चाललेले दिसून येत आहे.

बघता बघता सरकन निघून गेलेले वर्ष आठवतं, त्यातील चांगल्या गोष्टींना जवळ घेत आणि वाईट गोष्टींच्या अनुभवातून नव्या वर्षाकडे पहात असतो. नव्या वर्षात नक्कीच काहीतरी चांगले घडेल, विकास घडलाय आणखी घडेल हा विश्वासच जगण्याची आणि आयुष्य एँजॉय करण्याची उर्मी देऊन जातो. त्यानिमित्तानेच सगळीकडे प्लॅनिंग चाललेले आहे. मोठमोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट, बिचेस याठिकाणी जाण्यासाठी नवीन फंडे तरु णाई शोधत आहे. कॉलेज कटट््यापासून ते मोठमोठ्या हॉटेलसमध्ये जाण्याच्या बेतात असलेली तरूणाई सध्या वेगवेगळे प्लॅन करीत आहे. त्यात काही दुरुस्त्याही सुचविल्या जात आहेत. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त एॅजॉयमेंट कशी करायची?, कुठे- कुठे फिरायला जायचे? पार्ट्या कशा अरेंज करायच्या? कुटुंबासोबत दिवस घालवायचा की मित्रांसोबत फिरायला जायचे याच्याच विचारात सगळे आहेत.

मी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन माझ्या कुटुंबियांसोबतच करणार आहे. येणाऱ्या नवीन वर्षात काय करता येईल या संदर्भात आमचे संपूर्ण कुटुंब एक आरखडा तयार करून वर्षभर त्याची अंमलबजावणी करण्याच प्रयत्न करीत असते. नवीन वर्षाचा माझा संकल्प म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी साक्षरता मोहीम राबविणे हा राहील.
- प्रतीक्षा भगत
( इब्सर कॉलेज, कर्जत )


मी आणि माझे मित्र दरवर्षी गोवा याठिकाणी होणाऱ्या बीच म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन नववर्ष साजरा करीत असतो. थर्टी फसर््टचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आमचा हा दरवर्षीचा प्लान असून गोव्यासारख्या निसर्गरम्य ठिकाणी संगीताच्या तालावर नवीन वर्ष साजरा करणे हा अविस्मरणीय अनुभव आहे.
- अजय घोणे
(एमपीएएससी कॉलेज, पनवेल )


मी यावर्षीचा सेलिब्रेशन घरीच करणार आहे. त्यासाठी केक, खास जेवणाची सोयही आम्ही घरीच करणार आहोत, तसेच सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे, त्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार करण्याचा संकल्प यानिमित्ताने सोडणार आहे.
- प्रणोती शिंदे
( इब्सर कॉलेज, कर्जत )

 

Web Title: Party Hall Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.