भातकापण्या खोळांबल्या
By Admin | Updated: October 22, 2014 23:38 IST2014-10-22T23:38:15+5:302014-10-22T23:38:15+5:30
विधानसभेच्या निवडणूका आणि त्याला जोडूनच यावेळी दिवाळी आली आहे. या दोन्हींच्या रणधुमाळीत शेतमजूरांचा तुटवडा भासला

भातकापण्या खोळांबल्या
तुळशीदास घोगरे ,घनसावंगी
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश टोपे यांना मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य देवून विजयी केले. या मतदार संघात मोदी लाट चालली नाही. उलट भाजप आणि शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.
या निवडणुकीत सर्वच पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविल्याने त्या त्या पक्षाची ताकद समोर आली आहे. घनसावंगी मतदार संघात राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा, शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. काँग्रेस आणि मनसेला मतदारांनी नाकारले आहे. अगोदर पंचरंगी लढत होईल असे चित्र निर्माण झाले होते. मात्र निवडणूक निकालानंतर मतदार संघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होवून त्यात राष्ट्रवादीने बाजी मारून टोपे चौथ्यांदा निवडणून आले. १९९९ च्या निवडणुकीत साडेअकरा हजारांनी, २००४ मध्ये ३६ हजारांच्या, २००९ मध्ये २३ हजारांच्या तर २०१४ च्या निवडणुकीत ४३ हजारांच्या मताधिक्यांनी त्यांनी विजय मिळविला आहे.
टोपे यांना सर्वाधिक मते ५०६३२ मते घनसावंगी तालुक्यात पडली. या तालुक्यात भाजपाचे विलास खरात यांना ३२ हजार २७२ मते तर सेनेचे हिकमत उढाण यांना २५ हजार ६०३ मते मिळाली.
अंबड तालुक्यातील पाच सर्कल मध्ये टोपे यांना ३०८९८ मते, खरात यांना १५६०५ मते तर उढाण यांना ९१५९ मते मिळाली.जालना तालुक्यात चार सर्कल मध्ये टोपे यांना १६३५४ मते मिळाली. उढाण १०८५९ तर खरात यांना ६५९४ मते मिळाली. या तालुक्यात शिवसेना दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
पोस्टल मतामध्येही टोपे यांनीच बाजी मारली. त्यांना १४२ मते मिळाली. खरात यांना ८४ तर उढाण यांना ४२ मते मिळाली आहे.
घनसावंगी तालुक्यातील म. चिंचोली गावात भाजपाचे उमेदवार खरात यांना सर्वाधिक ११२८ मते मिळाली तर राजेश टोपे यांना ७७९, उढाण यांना ३१९ मते मिळाली आहे.
घनसावगी, तीर्थपूरी, कुंभारपिंपळगाव, आंतरवाली, म चिंचोली. रांजणी, पारडगाव या सातही सर्कलमध्ये टोपे यांना आघाडी मिळाली आहे.
एकूण या मतदार संघात शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे व इतर उमेदवारांना टोपे यांच्या विरोधात पन्नास टक्क्याहून अधिक मते मिळाली आहे. महायुती तुटली नसती तर शिवसेना व राष्ट्रवादी अशी लढत होवून यात विजय कोणाचा होईल हे सांगता आले नसते. मात्र महायुती तुटल्याने या दोन्ही पक्षाच्या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादीला झाला.
विधानसभा निवडणुकीत १९९९ पासून विलास खरात यांनी जेव्हा- जेव्हा राजकारणात सहभाग घेतला त्या वेळेस सेनेच्या मतांचे विभाजन होवून टोपे यांचे हिताचे झाले. आणि सेनेचे खच्चीकरण झाले. उलट जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विलास खरात यांचा सहभाग नसल्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत यश मिळाले होते. खरात यांचा सहभाग हा शिवसेनेसाठी मारक तर राष्ट्रवादीसाठी तारक असा ठरत असल्याची चर्चा मतदार संघात आहे.