Join us

पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा लोंढे दहावीत शंभर टक्के मिळवून मुंबईत पहिली

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 3, 2023 19:46 IST

पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा विक्रम लोंढे या विद्यार्थ्यांनीने शालांत परिक्षेत शंभर टक्के गुण मिळवून ती सर्व विद्यार्थ्यांमध्ये मुंबईत पहिली आली.

मुंबई - पार्ले टिळक विद्यालयाची पूर्वा विक्रम लोंढे या विद्यार्थ्यांनीने शालांत परिक्षेत शंभर टक्के गुण मिळवून ती सर्व विद्यार्थ्यांमध्ये मुंबईत पहिली आली. तिचे वडिल डॉ.विक्रम लोंढे हे कूपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. संपूर्ण वर्षात कोचिंग क्लास न करता शाळेत जे काही शिकवायचे त्यानुसार अभ्यास केला.विशेष म्हणजे तिने 1नृत्यात आपला ठसा उमटवला असून ती कथक विशारद आहे.

आजचा तिच्या अंधेरी पूर्व विजयनगर सोसायटी येथील घरी जाऊन उद्धव बाळासाहेब गटाचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर यांनी सत्कार केला आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शाखाप्रमुख प्रकाश सकपाळ, आनंद सुरेश पाठक, युवा सेना चिटणीस जयेश सावंत उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईदहावी