ठाणे - रिक्षा पार्किंगच्या वादातून रविवारीथेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शिवीगाळ करीत धमकी देणाऱ्या शैलेंद्र यादव (३५, रा. कशेळी, भिवंडी) या रिक्षाचालकाला अटक केल्याची माहिती चितळसर पाेलिसांनी साेमवारी दिली. या प्रकारानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या माफीनाम्याचा व्हिडीओ प्रसारित केला.
शैलेंद्र यादव आणि त्याचा साथीदार राकेश यादव या दाेघांनी दि. २३ नाेव्हेंबर राेजी रात्री ८ वाजता एका मराठी तरुणाला रिक्षा पार्किंगच्या वादातून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने अश्लील भाषेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली.
माफीनाम्याचा व्हिडीओ घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकाला जाब विचारला. त्याने माफीनाम्याचा व्हिडीओ तयार करून ताे व्हायरल केला. मनसेचे काेकणी पाड्यातील प्रभाग क्र. ५ चे उपविभाग अध्यक्ष रवींद्र महाले यांनी शैलेंद्र व राकेश यादव यांची चितळसर पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शैलेंद्र याला साेमवारी अटक केली आहे.
Web Summary : An auto driver was arrested for threatening MNS chief Raj Thackeray and Thane district head Avinash Jadhav following a parking dispute. The accused, Shailendra Yadav, had previously issued an apology video after MNS officials confronted him.
Web Summary : पार्किंग विवाद के बाद मनसे प्रमुख राज ठाकरे और ठाणे जिला प्रमुख अविनाश जाधव को धमकी देने पर एक ऑटो चालक को गिरफ्तार किया गया। आरोपी शैलेंद्र यादव ने पहले मनसे कार्यकर्ताओं द्वारा सामना किए जाने के बाद माफी का वीडियो जारी किया था।