Join us  

‘आॅनलाइन’ शिक्षणाच्या सेटअपचा खर्च पालकांनाच करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 1:53 AM

शाळेच्या खोल्यांचा वापर नसल्याने कमी मेंटेनन्स । तोपर्यंत फीमध्ये सवलत का नाही?

मुंबई : शाळांकडून ‘आॅनलाइन’ शिक्षण देण्याची तयारी दर्शविण्यात येत असली तरी त्यासाठी लागणाऱ्या इंटरनेट, लॅपटॉप, हेडफोन व अन्य स्टेशनरीचा खर्च हा पालकांनाच करावा लागणार आहे. तसेच शाळेच्या खोल्या वापरल्या जाणार नसल्याने त्यांना मेंटेनन्सचा खर्च कमी येणार हेही उघड आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास सुरुवात करेपर्यंत तरी फीमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे पालकांकडून करण्यात येत आहे.

आॅनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक पालकाला लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्टेशनरी किंवा वेगळ्या मोबाइलची व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच तितक्याच क्षमतेच्या इंटरनेटची गरजही त्यांना लागणार आहे, जेणेकरून मध्येच फोन डिस्कनेक्ट होणे, आवाज न येणे अशा समस्यांचा सामाना त्यांच्या पाल्यांना करावा लागू नये. तसेच त्यासाठी हेडफोन अथवा स्पीकरसारख्या गोष्टीही आल्यात. त्यामुळे याचा सगळा भुर्दंड पालकांवर येणार आहे. त्यातच मुलांना शिकवताना शांतता असणे आवश्यक आहे. जे चाळीमध्ये लहान घरात राहतात त्या लोकांना हे शक्य नाही. शिवाय आॅनलाइनच्या भानगडीत मुलांच्या कानावर आणि डोळ्यावर त्याचा दुष्परिणाम होण्याची भीतीही आहे. आॅनलाइन शिक्षण देताना शाळेच्या खोल्या वापरल्या जाणार नाहीत. त्यामुळे शाळेची स्वच्छता, पाणी, वीज तसेच अन्य बाबींचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शाळेत शिक्षण देण्यास सुरुवात होईपर्यंत तरी फीमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार सध्या कोरोनामुळे पालकांची ढासळलेली आर्थिक स्थिती लक्षात घेत सरकारने खासगी शाळांना याबाबत निर्देश द्यावेत, अशीही विनंती करण्यात येत आहे.गेल्या तीन महिन्यात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. तसेच अर्ध्या पगारावर घर चालविण्याची वेळ आली आहे. त्यातच मुलांची फी भरण्याची मोठी चिंता त्यांना लागून राहिली आहे. कारण ‘आॅनलाइन’ पद्धतीने शिक्षण देण्याची तयारी शाळांकडून दर्शविण्यात येत आहे.पालकांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रिया खालीलप्रमाणेशिक्षणासाठी पालकांवर नोकरी सोडण्याची वेळ!‘सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे, ज्यात अर्धा पगार मला मिळत आहे. त्यामुळे घरचा खर्च आणि शाळेच्या फीसाठी कसरत सुरू आहे. मात्र आॅफिस सुरू झाल्यावर काय करू? आम्ही आॅफिसला गेलो की मुलाच्या शिक्षणासाठी दुसरा फोन कुठून आणू? तसेच पाच ते सात वर्षांच्या मुलांना लॅपटॉप किंवा संगणक हाताळण्याची सवय नाही त्यामुळे तीही एक समस्या आहेच. त्यामुळे नोकरी सोडून या शिक्षणासाठी आम्हाला घरी बसण्याची वेळ येईल.गॅजेटपासून मुलांना दूर ठेवा!‘आम्ही मुलांचा शाळेत प्रवेश घेतला तेव्हा त्यांना मोबाइल, टीव्हीसारख्या गॅजेटपासून दूर ठेवा असा सल्ला इंटरव्ह्यू’ घेणाºया शिक्षकांकडून दिला जात होता. मात्र आता तेच शिक्षक आॅनलाइन शिक्षणासाठी तयार झाले आहेत याची खंत आहे.५०च्या वर्गात २० जण ब्लॉक!‘सध्या ज्या मुलांना आॅनलाइन शिकवले जात आहे त्यामध्ये एका सेशन वेळी ५० मुलांचा वर्ग भरतो. मात्र त्यातल्या १५ ते २० मुलांना ब्लॉक केले जाते. कधी त्यांच्या घरातून आवाज येतो म्हणून तर कधी इंटरनेटमुळे ही समस्या होते. मात्रएकदा डिस्कनेक्ट झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्यात कनेक्ट करण्याची तसदी घेतली जात नसल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.शाळा उशिरा सुरू करा : ‘सध्या नर्सरी ते दुसरीच्या वर्गात असणाºया मुलांची शाळा काही महिने उशिराने सुरू केली तर फारसा फरक पडणार नाही. तसेही आॅनलाइन क्लासमध्ये बसण्यास ते फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत तरी या मुलांचे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाऊ नये.

टॅग्स :मुंबईऑनलाइन